AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 13th May 2026 : प्रेयसीकडून फसवणूक होण्याची शक्यता… या राशीने सावध व्हावे!

Horoscope Today 13th May 2026, Wednesday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

Horoscope Today 13th May 2026 : प्रेयसीकडून फसवणूक होण्याची शक्यता... या राशीने सावध व्हावे!
HoroscopeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2026 | 6:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 13th May 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आज एखाद्या सामाजिक कार्यक्रमातच तुम्हाला तुमची जीवनसाथी मिळेल. तिच्या सहवासात तुम्ही सुखावून जाल. जीवनाच्या चढउतारात ही जीवनसाथी तुम्हाला खंबीर साथ देईल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखादी खूश खबर मिळेल. प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे. उधार दिलेली रक्कम परत मिळेल. आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

व्यावसायिक यश मिळेल. आरोग्याची समस्या आज दूर होताना दिसेल. प्रेम प्रकरणातील वादळ थंड होईल. पूर्वी पेक्षा आता त्यात सुधारणा होईल. एकंदरीतच तुमचा आजचा दिवस चांगला राहणार आहे. एखादी पिवळी वस्तू दान करा. धार्मिक कार्यात भाग घ्याल. गावाला जाण्याचा योग आहे. कोर्ट कचेरीच्या प्रकरणातून मुक्त व्हाल. मनसोक्त आंबे खाण्याचा योग आहे.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

प्रवासात मोठा फायदा होणार आहे. तुमच्या नशिबाने तुमची राहिलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. प्रेम प्रकरणात यश येईल. महाकाली मातेची पूजा करा. घरातील कलह दूर होतील. घरातील मोठ्या लोकांचा सल्ला घ्या. परस्पर निर्णय घेणं घातक ठले. आज वाहन खरेदीचा योग आहे.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आज गंभीर दुखापत होऊ शकते. एखाद्या अडचणीत सापडाल. त्यामुळे आज थोडं जपूनच वागा. आरोग्य मध्यम राहील. प्रेम आणि व्यापारातही बरा प्रतिसाद मिळेल. गावाकडील शेतीवाडीचे वाद सुटतील. मोठं काम हाती घ्याल. न कळत झालेल्या चुकीचा मोठा फटका बसेल. कुणालाही दुखावू नका. शेजारच्यांशी पटणार नाही. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा कसून अभ्यास करावा लागणार आहे.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आज लग्नाचा योग आहे. तुमचं लग्न जुळेल. मनासारखं स्थळ मिळाल्याने प्रसन्न राहाल. आज प्रियकर आणि प्रेयसीची भेट होईल. जीवनसाथी सोबतचा आजचा दिवस अत्यंत आनंदात जाईल. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. आरोग्य, प्रेम आणि व्यापारात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक न सांगता घरी पाहुणे येतील. शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस बरा नाही. अवकाळीमुळे नुकसान होईल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

विरोधक आज तुमच्या मागेपुढे करतील. तुमच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामागे काही डाव असू शकतो. सावध राहा. आज तुमचं बऱ्याच महिन्यांपासून अडलेलं काम मार्गी लागेल. गावाकडे जाण्याचा योग आहे. खूप जुना मित्र भेटल्याने आनंदाला पारावर उरणार नाही. तुमच्या जुन्या शाळेत जाण्याचा योग येईल. घरातील कलह वाढतील. त्यामुळे थोडा त्रास होईल.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

जुनी लफडी डोकं वर काढतील. त्यामुळे घरात कटकटी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोकं शांत ठेवून प्रकरण मिटवण्यावर भर द्या. विद्यार्थ्यांसाठी आज चांगला दिवस आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी जाणार आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यापारात लाभ होईल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आज नको त्या भानगडीत पडू नका. जमीन, वाहन आणि घर खरेदी करण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे. नवीन उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांना आजचा दिवस वाईट जाईल. कामाच्या ठिकाणचे सहकारी त्रास देण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून ओरडा पडण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आज तुम्ही अधिक आक्रमक राहाल. रोजगारात यश मिळवण्यासाठी तुम्हाला आज भावा-बहिणीची भक्कम साथ मिळेल. लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. मनोरंजन क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस घवघवीत यश देणारा राहील. आरोग्यात हळूहळू सुधारणा होईल. बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. नको त्या उचापती करू नका. उगाच हिरो बनण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर अडचणी वाढतील.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आज तुमच्याकडे पैशाचा ओघ राहील. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबीयांशी जुळवून घ्याल. कामाच्या ठिकाणी होणारा त्रास कमी होईल. अचानक नोकरी बदलावी लागण्याची शक्यता आहे. परदेश दौऱ्याचा योग आहे. व्यापारात बरकत येईल. सासरकड्या मंडळीकडून आर्थिक लाभ होईल. इतरांच्या प्रेमप्रकरणात पडू नका. नाही तर तुम्ही गोत्यात याल. परीक्षेची तयारी जोरात करा. व्यापारात आज अग्नि परीक्षा ठरणार आहे.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आज तुमचा मान सन्मान वाढेल. समाजात तुमचं कौतुक होईल. तुमचं यश तुमची उंची वाढवण्यास कारणीभूत ठरणार आहे. बऱ्याच दिवसापासून आजारी असणाऱ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. सोन चांदी खरेदी करण्याचा योग आहे. वाहन खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. आज तुमच्या मनासारखं स्थळ सांगून येईल. त्यामुळे तुमचं लग्न जुळण्याची शक्यता आहे. गोरगरीबांना मदत कराल. मित्राच्या आर्थिक अडचणीत धावून जाल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विचलित होऊ नका. कोणतीही मोठी गोष्ट होणार नाही. फक्त आज तुम्ही बैचेन व्हाल. प्रेमभंग, आरोग्याची तक्रार आणि व्यापारात न होणारा नफा यामुळे मन विचलित होईल. धार्मिक कार्यात स्वत:ला गुंतवून घ्याल. गावाकडे जाण्याचा योग आहे. प्रेयसीकडून फसवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं जपून वागा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर...
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर....
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा.
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय...
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय....
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!.
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची...
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची....
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड.
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?.
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या..
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?.