शनिदेव 17 ऑक्टोबरपर्यंत राहणार राहुच्या नक्षत्रात, तुमच्या राशीवर काय परिणाम होईल जाणून घ्या

ज्योतिषशास्त्र हे क्षणाक्षणाला बदलत असतं. कारण प्रत्येक ग्रहांची स्थिती बदलत असते. त्याचा राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. तसेच जातकांना या काळात कठीण काळातून जावं लागतं.

शनिदेव 17 ऑक्टोबरपर्यंत राहणार राहुच्या नक्षत्रात, तुमच्या राशीवर काय परिणाम होईल जाणून घ्या
शनिदेव 17 ऑक्टोबरपर्यंत या राशींवर राहतील मेहरबान, वाचा तुम्हाला कशी फळं मिळतील
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 9:59 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात बरंच खोल असून राशीचक्र आणि ग्रहमंडळातील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची ठरते. अनेकदा चांगलं ग्रहमान असूनही अपेक्षित फळ मिळत नाही. त्यामुळे नेमकं काय चाललंय असा प्रश्न पडतो. ग्रह राशी गोचरासोबतच नक्षत्र गोचर देखील करत असतात आणि त्याचा परिणाम कमी अधिक प्रमाणात जातकावर होत असतो. सध्या शनिदेव कुंभ राशीत आहेत. पण 15 मार्च 2023 रोजी शनिदेवांनी राहुचं नक्षत्र असलेल्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे.

27 नक्षत्र मंडळातील शतभिषा हे 24 वं नक्षत्र आहे. हे नक्षत्र राहुचं आहे. दुसरीकडे राहु ग्रह सध्या मेष राशीत आहे. मेष राशीत राहु उच्च असल्याने शुभ परिणा दिसून येतात. या स्थितीचा काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येतो. चला जाणून घेऊयात याबाबत

मेष : या राशीच्या जातकांना या स्थितीचा चांगला लाभ मिळेल. नव्या व्यवसायाची या काळात सुरुवात होऊ शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना याचे शुभ परिणाम दिसून येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मिथुन : शनि अडीचकीतून सुटका झाल्यानंतर शनि राहुच्या या स्थितीचा यचा जातकांना फायदा होईल. या काळात कामानिमित्त लांबचा प्रवासचा योग जुळून येईल. नशिबाची पूर्ण साथ या काळात मिळेल.

सिंह : या राशीच्या जातकांनी शनिदेव चांगली फळं देतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला याचे सकारात्म परिणाम दिसून येतील. पगारवाढ किंवा पदोन्नती होऊ शकते. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

तूळ : नुकतीच अडीचकीतून सुटका झालेल्या या राशीच्या जातकांना शनिदेवांची कृपा राहील. नक्षत्र गोचर तुम्हाला करिअर उंचावण्यास मदत करेल. विद्यार्थ्यांसाठी हे गोचर शुभ ठरेल. नवीन शिकण्याची इच्छा या काळात पूर्ण होईल.

धनु : साडेसातीतून सुटका झाल्यानंतर आता शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्याची वेळ आहे. तुमच्यासाठी ही स्थिती चांगली राहील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. अडकलेली महत्त्वाची कामं मार्गी लागतील.

मकर : केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला या काळात चाखता येणार आहे. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. तसेच नोकरीच्या ठिकाणी किचकट काम झटकन पूर्ण कराल. त्यामुळे बॉस तुमच्यावर खूश राहील.

शनिदेवांची वरील सहा राशींवर कृपा राहील. तर वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशींना संमिश्र फळं मिळतील. या काळात अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो. यासाठी शनिदेवांशी निगडीत उपाय करावेत. दररोज शनिदेवांची एक माळ जप करावा. त्यामुळे थोड्या अधिक प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती उपलब्ध स्रोतावर आधारित आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.