AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : आजचे राशी भविष्य 03 जून 2023, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याचे योग

आजचे राशी भविष्य जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांचे शुभकार्यात पैसे खर्च होतील.

Astrology : आजचे राशी भविष्य 03 जून 2023, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याचे योग
राशी भविष्यImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 03, 2023 | 9:33 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष

आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्यांवर सहज मात कराल. नोकरीत स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. सामाजिक कार्यात सक्रीय भूमिका राहील. व्यापार रोजगार चांगला चालेल. मुलांसंबंधातील कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परिक्षेत भाग घ्यावा यश निश्चित मिळेल. उद्योग व्यवसायात यश मिळण्याचे योग आहेत. जोखमीचे कामे फक्त टाळा. विचारपुर्वक मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

वृषभ

आज रोजगारात वातावरण चांगले असल्यामुळे नवीन कार्याची योजना आखाल. नोकरीत या योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होईल. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. मान-सन्मानाचे योग मिळेल. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील.

मिथुन

नोकरी रोजगात मनाची अस्वस्थता वाढवणारे प्रसंग घडतील. आर्थिक टंचाई निर्माण होतील. मन कामात लागणार नाही. घाईत निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चामध्ये वाढ होईल. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.वाहन सावकाश सांभाळुन चालवा. अपघात भय संभवते.

कर्क

नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहिल.नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. मोठ्या तसेच प्रतिष्ठित लोकांशी संबंध वाढतील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल. विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल. आपल्या कामाची स्तुती होईल. मानसन्मान वाढीस लागेल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.

सिंह

नोकरीत स्वतःचे निर्णय प्रभावी पद्धतीत मांडा. रोजगारात बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नीच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढणार आहे. शारिरिक व्याधी उद्‌भवतील. शक्यतो प्रवास टाळा. वाहनापासुन इजा संभवते. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दयावे. व्यसनापासुन दुर रहा. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक वादविवाद टाळावेत.

कन्या

समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. उद्योग व्यापार तेजील राहिल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. भाऊबहिणीसी सलोख्याचे संबंध राहतील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील. प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल.

तुला

नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. निंदानालस्ती टाळा. संयमी भुमिकेतुन वाटचाल करावी.

वृश्चिक

नोकरीत जबाबदारीच्या कामात सावधानतेने पाऊल उचला. जास्त उत्साह दाखविल्यामुळे जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. भांवडाकडून सहकार्य लाभणार आहे. एकंदरित सामान्य कामासाठी दिवस चांगला राहणार आहे. वाईट सवयी पासून दूर रहा.

धनु

नवीन योजना टाळा. नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. नोकरीत स्वतःचा निर्णयावर ठाम राहिल्याने आपल्याला प्रतिकूल परिणाम दिसून येतील. आपले प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. सन्मान व किर्ती डागळण्याची शक्यता आहे.खर्च विचारपूर्वक करावा. सरकारी कामे रखडतील. व्यापारात आर्थिक हानी घडण्याची शक्यता आहे. मनस्ताप हानी होण्याची शक्यता चालूनही आहे. मुलांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. अप्रिय बातमी ऐकण्यास मिळु शकते.

मकर

घरामध्ये लक्ष दिले असता घरातील समस्या सहजा सहजी दूर होतील. व्यापार रोजगारात लग्न स्थानातील भ्रमणामुळे अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. कुंटुंबातील समस्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर नियोजन सोडविण्याचा प्रयत्न करा. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहिल. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमण घडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कुंभ

विवेकबुद्धीने काम करा. अन्यथा हानी संभवते. घरात एखादयाशी मतभेद निर्माण होतील. शुभकार्यात पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे. सामाजिक किंवा साहित्यिक समारंभात भाग घ्याल. भांडण आणी वाढविवाद टाळावेत. कुटुंबातील सदस्याच्या सहकार्याने कामात यश संपादन कराल. पत्नीसोबत वाद घालू नका. पत्नीच्या सहकार्याने काही योजनावर कार्य सुरु कराल. आर्थिक परिस्थितीत प्रयत्नाने सुधारणा होऊ शकते.

मीन

कामकाजा मध्ये वाढ होईल. अनुकुल स्थिती राहणार आहे. नोकरीत वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. विचाराअंतीच निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे. संततीकडून समाधान लाभेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.