Raksha Bandhan 2023: रक्षाबंधन या दिवशी ग्रहांचा अनोखा मेळा, शुभ योगामुळे चार राशींना मिळणार जबरदस्त साथ
रक्षाबंधन या दिवशी खास योग असल्याने हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. काही राशीच्या जातकांना या योगाचा लाभ मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घ्या..

मुंबई : हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन बहीण भावामधील नातं दृढ करणारा दिवस असतो. या दिवशी बहीण भावाकडून रक्षण करण्याचं वचन घेते. पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी सुरु होईल आणि 31 ऑगस्टला सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी संपेल.रक्षाबंधन हा सण 30 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवशी काही योग असल्याने हा दिवस खास असणार आहे. पंचांगानुसार सुकर्मा, धृति आणि अतिगंड योग या दिवशी असणार आहे. त्याचबरोबर चंद्र हा कुंभ राशीत असणार आहे. 30 ऑगस्टला चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत शनिदेव असल्याने युती होईल. या युतीमुळे विष योग जुळून येईल. यामुळे काही राशींना जपून राहावं लागेल. तर चार राशींच्या जातकांना लाभ होणार आहे.
या राशीच्या जातकांना मिळणार लाभ
मेष : या राशीच्या जातकांना राखीपौर्णिमा खास असणारर आहे. कौटुंबिक वातावरण या कालावधीत चांगलं असणार आहे. त्यामुळे वेगळाच आत्मविश्वास असणार आहे. गेल्या काही दिवसात अडकलेली कामं यामुळे मार्गी लागणार आहेत. व्यावसायातही यश मिळताना दिसेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत या कालावधीत दिसतील. पदोन्नती होण्याची शक्यता आहे.
कन्या : या राशीच्या जातकांना यश मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्णत्वास येतील. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. समाजात मानसन्मान वाढेल. तसेच कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. गेल्या काही दिवसांपासून असलेले वाद संपुष्टात येतील. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल.
मकर : शुभ योग आणि ग्रहांची साथ मिळणार आहे. त्यामुले नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. एखादं किचकट काम तुम्ही चुटकीसरशी पूर्ण कराल. व्यावसायात काही करार निश्चित होतील आणि त्याचा लाभ तुम्हाला भविष्यात होईल.
मीन : या राशीच्या जातकांना धनलाभ होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर हा दिवस चांगला आहे. काही गोष्टी आपल्या हातून नकळत घडतील. पण त्या आपल्या भल्यासाठीच असतील याची जाणीव ठेवा. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नवीन काही शिकण्याची इच्छा असेल तर त्या दिशेने मार्गक्रमण सुरु होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
