Vastu Tips: तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा करा जप; सर्व समस्या होतील दूर

तुळशीला योग्य दिशेला ठेवले तरच शुभ परिणाम प्राप्त होतात.  धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला जल अर्पण केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

Vastu Tips: तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा करा जप; सर्व समस्या होतील दूर
तुलसी पूजा मंत्र
नितीश गाडगे

|

Jul 27, 2022 | 4:17 PM

तुळशीचे हिरवे रोप सुख आणि समृद्धीचं प्रतीक आहे. हिंदू धर्मात तुळशीच्या (Tulsi Puja) रोपाला विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपातून सकारात्मक उर्जेचा संचार होतो, अशी मान्यता आहे.  हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचं रुप मानलं जातं. वास्तुशास्त्रातही (Vastu Tips) तुळशीच्या रोपाला वेगळं स्थान आहे. वास्तूमध्येही (Vastushastra) तुळशीचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. तुळशीला योग्य दिशेला ठेवले तरच शुभ परिणाम प्राप्त होतात.  धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला जल अर्पण केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तुळशीची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशीला जल अर्पण करताना मंत्राचा जप केल्यास आयुष्यातल्या समस्या दूर होतात.

जल अर्पण करताना हा एक मंत्र म्हणा

ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करताना या विशेष मंत्राचा उच्चार केल्यास सकारात्मक उर्जा अनेक पटीने वाढते. एवढेच नाही तर या मंत्राचा जप केल्याने रोग, दु:ख, समस्या इत्यादीपासून मुक्ती मिळते.

मंत्र- महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।।

हे सुद्धा वाचा

तुळशीला जल अर्पण करण्याचे नियम

  1. शास्त्रानुसार स्नान न करता तुळशीला स्पर्श करणे पाप मानले जाते. त्यामुळे नेहमी आंघोळीनंतरच तुळशीला पाणी अर्पण करावे.
  2. तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये.
  3. रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये. या दिवशी तुळशीमातेचा विसावा असतो.
  4. ज्योतिषशास्त्रानुसार एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये. असे मानले जाते की या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते.
  5. तुळशीमध्ये जास्त पाणी टाकू नये. तसेच सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी देणे शुभ मानले जाते.
  6. तुळशीचे रोप नेहमी पूर्व दिशेला लावावे असे वास्तूतज्ज्ञांचे मत आहे.
  7. याशिवाय तुळशीचे रोप ईशान्य दिशेला लावता येते. या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा आणि शुभ फल देते. मात्र तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेवू नका

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें