AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | दोन राशींचं लग्न म्हणजे तुझं माझं जमेना, अन् तुझ्यावाचून करमेना, शुभमंगल करताना व्हा सावधान!

भारतात लग्न करण्यापूर्वी दोन व्यक्तींच्या कुंडली ज्योतिषींना दाखवून जुळवल्या जातात. जन्मकुंडलीमध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्रे इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळवतात. याच्या आधारे त्या जोडीचे भविष्य वर्तवले जात असते. पण, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी राशी देखील जुळल्या पाहिजे

Zodiac Signs | दोन राशींचं लग्न म्हणजे तुझं माझं जमेना, अन् तुझ्यावाचून करमेना, शुभमंगल करताना व्हा सावधान!
Rashifal
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 7:54 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी त्या दोन व्यक्तींच्या कुंडली ज्योतिषींना दाखवून जुळवल्या जातात. जन्मकुंडलीमध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्रे इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळवतात. याच्या आधारे त्या जोडीचे भविष्य वर्तवले जात असते. पण, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी राशी देखील जुळल्या पाहिजे (These zodiac signs has opposite in nature should avoid to marry each other for happy life). प्रत्येक राशी व्यक्तीच्या स्वभावावर परिणाम करते. जर दोन विरुद्ध राशीच्या लोकांचे लग्न झाले तर दररोज त्यांच्या आयुष्यात काहीतरी ना काही चुकीचे घडत राहते. चाला तर मग जाणून घेऊयातअशा राशींबद्दल, ज्यांचे आपापसात कधीही जुळत नाही, त्यांनी लग्न करण्यापूर्वी योग्य विचार करणे फार महत्वाचे आहे.

कर्क आणि सिंह –

ज्योतिषानुसार कर्क आणि सिंह यांच्यात काही मेळ नाही. कर्क राशीचे लोक त्यांच्या जोडीदाराशी जोडलेले असतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतात. तर सिंह राशीचे व्यक्ती स्वतंत्र विचारांचे असतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते. अशा परिस्थितीत ते कर्क राशीच्या व्यक्तींच्या अपेक्षांवर खरे उतरत नाही.

कुंभ आणि मकर –

कुंभ आणि मकर दोघांनाही नात्याबद्दल चांगली समज आहे, परंतु त्यांच्या विपरीत स्वभावामुळे ते एकमेकांशी जुळत नाहीत. मकर राशीचे लोक खूप भावनिक असतात, तर कुंभ लोक प्रत्येक निर्णय व्यावहारिकपणे घेतात. हा फरक त्यांच्या दरम्यानच्या संघर्षाचे कारण बनतो आणि बर्‍याच वेळा हे प्रकरण संबंधाच्या शेवटी येते.

वृषभ आणि तुळ –

या दोन्ही राशीचे लोक अतिशय बुद्धिमान आणि स्वच्छ हृदयाचे असतात. सुरुवातीच्या काळात त्यांच्यात खूप चांगले संबंध राहतात, परंतु हळूहळू ते एकमेकांना आपला मुद्दा पटवण्यासाठी आग्रह करु लागतात. यामुळे त्यांच्यात अहंकाराची समस्या उद्भवते आणि त्यांचे संबंध कमजोर होऊ लागतात.

कर्क आणि धनु –

कर्क आणि धनु राशीचे व्यक्ती जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकत नाही. धनु राशीच्या लोकांना वेळेसोबत आणि वेळेनुसार प्रगती करणे चांगले माहित आहे, तर कर्क राशीच्या व्यक्तींवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगायला आवडते. यामुळे, त्यांच्या जीवनात अनेकदा भांडणे आणि तणावाच्या परिस्थिती उद्भवतात.

एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.