Special Story | डॉ. शीतल आमटे आत्महत्या : 30 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत काय काय घडलं? सविस्तर घटनाक्रमाचे 10 मुद्दे

डॉ. शीतल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कामाविषयी आणि वादाबाबत अनेक चर्चा समोर आल्या. (Dr. Sheetal Amte Suicide Case Investigation Update)

Special Story | डॉ. शीतल आमटे आत्महत्या : 30 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत काय काय घडलं? सविस्तर घटनाक्रमाचे 10 मुद्दे
Dr. Sheetal Amte
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 1:13 AM

चंद्रपूर : महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी आत्महत्या केली. विषारी इंजेक्शन टोचून डॉ. शीतल यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली. या घटनेमुळे सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला. (Dr. Sheetal Amte Suicide Case Investigation Update)

डॉ. शीतल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कामाविषयी आणि त्यांच्या संदर्भातील वादाबाबत चर्चा समोर आल्या. तसेच आमटे परिवारातील वादही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. गेल्या काही काळापासून बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन या सामाजिक उपक्रमाबद्दल बरेच वाद होते. या सर्व वादांच्या केंद्रस्थानी असलेल्या शीतल आमटे असल्याचेही बोलले जाते.

?डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्यानंतरचा एक सविस्तर घटनाक्रम?

1) 30 नोव्हेंबर 2020 : आनंदवनच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले गेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करत मृतदेह शव विच्छेदनासाठी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविला. यानंतर 4 डॉक्टरांच्या पथकाने त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. याबाबतचा संपूर्ण अहवाल त्यांनी पोलिसांना दिला. त्यांच्या आत्महत्येमुळे आनंदवनासह सामाजिक क्षेत्राला जबरदस्त धक्का बसला.

2) 30 नोव्हेंबर 2020 : त्याच दिवशी रात्री आनंदवन येथे स्व. बाबा आमटे यांच्या समाधीशेजारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येच्या महिनाभर आधीपासून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात वास्तव्याला असलेले आमटे कुटुंबीय अंत्यसंस्काराला उपस्थित होते. मात्र त्यानंतर लगेचच हेमलकसा येथे रवाना झाले.

3) 20 नोव्हेंबर 2020 : डॉ. शीतल यांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांनी मृत्यूच्या 15 दिवस आधी फेसबुक लाईव्ह केले होते. यावेळी 18 मिनिटांच्या फेसबुक लाईव्हदरम्यान आमटे कुटुंबियांनी आपल्याला वेगळे पाडल्याचे, आपल्यावर बालपणी लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप डॉ. शीतल यांनी केले. यानंतर काही मिनिटातच त्यांनी हे फेसबुक लाईव्ह डिलीट केले होते. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला होता.

4) 22 नोव्हेंबर 2020 :- या फेसबुक लाईव्हनंतर पुढील दोन दिवसात म्हणजे 22 नोव्हेंबरला हेमलकसा येथून आमटे कुटुंबियांनी एक संयुक्त पत्रक जारी केले होते. यावेळी डॉ. शीतल निराशेने ग्रस्त आहे. त्यांच्यावर मानसिक उपचार सुरु आहेत. संस्थेत सर्व काही आलबेल असल्याचे म्हटले होते.

5) 30 नोव्हेंबर 2020 :- चंद्रपूर पोलिसांनी डॉ. शीतल यांचे शव आढळलेल्या घराची झाडाझडती घेतली. त्यानंतर डॉ. शीतल यांचा मोबाईल, लॅपटॉप, टॅब या गोष्टी चौकशीसाठी ताब्यात घेतल्या. तसेच घराची झडती घेतेवेळी पोलिसांना घटनास्थळी तुटलेल्या अवस्थेतील सिरिंज आढळून आल्या. त्यामुळे या आत्महत्येमागील गूढ वाढले.

6) 2 डिसेंबर 2020 :- डॉ. शीतल यांनी आपल्या पाळीव कुत्र्यांवर उपचारासाठी काही इंजेक्शन्स मागवली होती. त्यातील एक इंजेक्शन अँप्युल रिकामे आढळले होते. हेच घातक इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली असावी, अशी थेअरी पुढे आली. मात्र त्यांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले गेले.  (Dr. Sheetal Amte Suicide Case Investigation Update)

7) 2 डिसेंबर 2020 :- डॉ. शीतल यांचे सासू सासरे (सुहासिनी करजगी – निवृत्त कर्नल शिरीष करजगी) यांनी एक कथित फेसबुक पोस्ट केली होती. मात्र त्यानंतर काही मिनिटात ती त्यांनी डिलीट केली. यात करजगी कुटुंबाने डॉ. शीतल या निराशेत असताना, त्यांच्या माहेरील (आमटे) कुटुंबाने त्यांना एकटे सोडलं होतं, असा आरोप केला. आमटे कुटुंबाने सेवाप्रकल्प चालविताना मुलगा-मुलगी भेद केल्याचा गंभीर आरोप करजगी कुटुंबियांकडून करण्यात आला. मृत डॉ. शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी अशी पोस्ट आपल्या आईवडिलांनी लिहिली असल्याची पुष्टी केली. मात्र कुठलीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

8) 13 डिसेंबर 2020 :- डॉ. शीतल आमटे यांना श्रद्धांजली देण्यासाठी आनंदवनात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला आमटे-करजगी परिवारात फूट पडल्याचे समोर आलं. डॉ. शीतल यांच्या श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंबातील एकही सदस्याने हजेरी लावली नाही. तसेच या सभेत  डॉ. शीतल यांच्या सासऱ्यांनी स्वतःच्या चर्चित फेसबुक पोस्टवर बोलण्यास नकार दिला. तसेच आमटे कुटुंबियांच्या अनुपस्थितीबद्दल विचारल्यावर बोलण्यासही त्यांनी स्पष्ट नकार दिला.

9) 14 डिसेंबर 2020 :- डॉ. शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी (CEO आनंदवन ) हे पाच वर्षीय मुलगा शर्विलसह पुण्याला रवाना झाले. मुलाला तणावाच्या वातावरणातून दूर जाण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला.

10 ) 30 डिसेंबर 2020 : तब्बल महिनाभरानंतरही डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूबाबत चंद्रपूर पोलिसांच्या तपासात अल्प प्रगती पाहायला मिळाली. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषदेत डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. मात्र यात पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.

जून 2020 मध्ये डॉ. शीतल यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा नवी अधिकृत माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली. व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत राखून ठेवल्याची माहिती देण्यात आली. डॉ. शीतल यांचा मृत्यू घातपात नसल्याची महत्वपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे.

यावेळी घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. डॉ. शीतल यांच्या मृत्यूबाबत महत्त्वाचा खुलासा करु शकणारे त्यांचे टॅब-मोबाईल-लॅपटॉप यांचा मुंबई प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. (Dr. Sheetal Amte Suicide Case Investigation Update)

संबंधित बातम्या : 

आमटे कुटुंबात नेमका वाद कोणता; डॉ. शीतल आमटे-कराजगींनी का उचललं टोकाचं पाऊल?

Dr. Sheetal Amte | डॉ. शीतल आमटेंच्या श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंबीय गैरहजर

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....