मिठाचे 3 चमत्कारिक उपाय तुमचे भाग्य बदलू शकतात, बादलीभर पाण्यात चिमूटभर मीठ मिसळा अन्… फरक नक्की दिसेल
घरात येणारी कोणतीही आर्थिक समस्या किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचे उपाय फारच प्रभावी ठरतात. चिमूटभर मिठाच्या मदतीने आपण आपल्या भोवतालील आणि घरातील नकारात्मक शक्ती देखील दूर करू शकता. रोजच्या आयुष्यात मिठाचा उपयोग काय आणि त्याचे उपाय कसे प्रभावी ठरू शकतात हे जाणून घेऊयात.

मीठ हा पदार्थ सर्वांच्या घरात असतो. कारण मिठाशिवाय आपण आपलं रुचकर जेवण कल्पनाच करू शकत नाही. पण मीठ हे फक्त जेवणापुरतंच वापरलं जातं असं नाही. पण वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील अनेक उपायांमध्येही वापरलं जातं. जसं की, एखादी व्यक्ती आपल्या ग्रह आणि ताऱ्यांची वाईट स्थिती सुधारण्यासाठी मिठाचा उपाय करू शकते. घरात येणारी कोणतीही आर्थिक समस्या किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा उपाय प्रभावी ठरू शकतो. चिमूटभर मिठाच्या मदतीने एखादी व्यक्ती आपले नशीब देखील बदलू शकते. तर अशापद्धतीने आपल्या आयुष्यात मीठ नक्की कसं काम करतं, हे जाणून घेऊयात.
तुम्हाला आर्थिक समस्या दूर होण्यास मदत मिळेल
ज्योतिषशास्त्रात, आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही मिठाचा एक प्रभावी उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला मीठ ठेवायचे आहे. एका ग्लासमध्ये मीठ आणि पाणी घ्या आणि ते या दिशेला ठेवा. दर 15 दिवसांनी ते बदलत राहा आणि काही दिवसांत तुम्हाला स्वतःला फरक दिसू लागेल. यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतील.
मीठाने फरशी पुसणे
एका छोट्या बादलीत पाणी घेऊन त्यात मीठ मिसळून फरशी पुसल्याने घरातील आर्थिक समस्या आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. शुक्रवारी मिठाचा हा उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते. जर तुम्ही दररोज मिठाच्या पाण्याने फरशी पुसू शकत नसाल तर किमान शुक्रवारी तरी हा उपाय नक्की करावा. त्यामुळे घरात येणाऱ्या पैशांचे मार्गही मोकळे होतात.
वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी
वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी देखील मीठ खूप प्रभावी ठरते. जसे काहींच्या घरी मीठ-मोहरीने नजर काढतात. तशीच अजून एक पद्धत म्हणजे मुलांना वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी, तुम्ही त्यांना बादलीभर पाण्यात अगदी चिमूटभर मीठ घालून आंघोळ घालू शकता. यामुळे लहान मुलांना वाईट नजरेचा त्रास होणार नाही आणि ते सुरक्षित राहतील. किंवा तुम्ही देखील अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून रोज जमलं नाही तर किमान आठवड्यातून एकदा तरी अशी अंघोळ करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
