AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाणक्य यांच्या सल्ल्यानुसार यश मिळवण्यासाठी तुमच्या मनातून काढून टाका ‘या’ गोष्टींची भीती

आचार्य चाणक्य यांच्या नीतिमत्तेवरील ग्रंथात काही तत्त्वे सांगितली आहेत जी जीवनात अंगीकारल्यास तुम्हाला मोठे यश मिळू शकते. चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

चाणक्य यांच्या सल्ल्यानुसार यश मिळवण्यासाठी तुमच्या मनातून काढून टाका 'या' गोष्टींची भीती
| Edited By: | Updated on: Mar 27, 2026 | 8:23 PM
Share

आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि अर्थतज्ञ आणि कुटनीतीतज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी स्वभावाचा विविध पैलुंवर विस्तृत लिखाणं केलेलं आहे. तर यामध्ये त्यांनी असेही सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही भीती असते जी त्याला त्यांच्या यशाच्या पुढे जाण्यापासून रोखते. तर आजच्या लेखात आपण चाणक्य नीतीमध्ये नमूद केलेल्या काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या एखाद्या व्यक्तीने आपल्या मनातून काढून टाकल्या पाहिजेत. तरच तो जीवनात यश मिळवू शकतो.

1. कस्य दोषः कुले नास्ति व्याधिना को न पीडितः। व्यसनं केन न प्राप्तं कस्य सौख्यं निरन्तरम् ॥

चाणक्य नीतितील हे श्लोक जीवनातील वास्तवाचे प्रतिबिंब आहे. या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य सांगतात की “कोणाच्याही कुटुंब कुळात दोष नसतो? आजाराने कोण ग्रस्त नाही? दुःख कोणाला होत नाही? या जगात सतत आनंदी कोणीही राहत नाही. म्हणजेच या जगात कोणीही परिपूर्ण नसते, कोणाला ना कोणाला काही ना काही दोष किंवा समस्या असतात. कोणीही संकटापासून मुक्त नाही. त्यामुळे यावर संघर्ष करून पुढे चालत राहणे आणि आपले यश गाठणे.

2. त्यजेदेकम कुलस्यर्थे ग्रामस्यर्थे कुलम् त्यजेत्। ग्राम जनपदस्यर्थे आत्मार्थे पृथ्वी त्यजेत् ।

या श्लोकाचा अर्थ असा आहे की एखाद्याने कुळासाठी एखाद्या व्यक्तीचा, गावासाठी एखाद्या कुळाचा त्याग केला पाहिजे. राज्यासाठी गावाचा आणि स्वरक्षणासाठी जगाचाही त्याग केला पाहिजे. चाणक्य या श्लोकात सांगतात की राष्ट्र आणि धर्माचे रक्षण करणे हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा पहिले प्राधान्य असले पाहिजे आणि या उद्देशासाठी त्याग करण्यास घाबरू नये.

3. यथा चतुर्भिः कनकम परिक्ष्यते निर्घर्षछेदं तपतदानैः । तथा चतुर्भिः पुरुषः परिक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्माना ।

या श्लोकात चाणक्य म्हणतात की ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा घासून, कापून, तापवून आणि मारून केली जाते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याच्या त्याग, चारित्र्य, सद्गुण आणि कृतींद्वारे घेतली जाते. म्हणून अशा परीक्षांना घाबरू नये, कारण त्या व्यक्तीच्या चारित्र्याचे मूल्यांकन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं