Chanakya Neeti : विवाहित पुरुष परस्त्रीकडे आकर्षित का होतात? आर्य चाणक्य यांनी सांगितली आहेत ही 3 कारण
आर्य चाणक्य हे एक महान विद्वान, अर्थतज्ज्ञ, कुटनीतीतज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विद्वान, अर्थतज्ज्ञ, कुटनीतीतज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या आजही आपलं आयुष्य जगत असताना अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये पती-पत्नीमधील संबंध कसे असावेत? आदर्श पती कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षण काय? पत्नीचा पतीसोबत व्यवहार कसा असावा? पतीने पत्नीशी कसं वागवं अशा अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लग्न झालेले पुरुष इतर स्त्रियांकडे का आकर्षित होतात? याची काही कारणं देखील सांगितली आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
आर्य चाणक्य म्हणतात की अनेकदा ज्या पुरुषाचं लग्न झालं आहे, तो देखील इतर स्त्रियांकडे आकर्षित होतो. मात्र यामुळे त्याच्या पत्नीच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. कुठलीही स्त्री आपल्या पतीचे दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध आहेत, ही गोष्ट सहन करू शकत नाही. त्यामुळे तुमचा संसार देखील मोडू शकतो. इतर देखील अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे पुरुषांनी याबाबतीत सावध राहावं असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे. तसेच असं का होतं ? याची काही कारण देखील त्यांनी सांगितली आहेत.
कमी वयात लग्न – आर्य चाणक्य म्हणतात कमी वयात लग्न करणं हे धोकादायक असतं, कारण तेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांनाही पुरेशी समज नसते. मात्र जेव्हा वय वाढतं तेव्हा त्यांना आपल्या आवडी -निवडींची जाणीव होते, यातून देखील असे प्रकार घडू शकतात.
पती-पत्नीमधील वाद – जर पती-पत्नीमध्ये सतत भाडंण होत असतील, तर अशावेळी घरातील पुरुष इतर स्त्रियांकडे आकर्षित होऊ शकतात. त्यांना एखादी दुसरी स्त्री आवडू शकते. प्रेम दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतात यातून मोठा अनर्थ होऊ शकतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
मुलं जन्माला आल्यानंतर त्या घरातील स्त्रीचा सगळा वेळ हा मुलांच्या संगोपनात जातो. अशावेळी तिचं आपल्या पतीकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे देखील पुरुष परस्त्रीकडे आकर्षित होतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
