Chanakya Niti : …तर तुमचा शत्रूही तुमचा शब्द टाळणार नाही, चाणक्य नीतीत काय सांगितलंय?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ आणि राजनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे, आपला मित्र कोणाला म्हणावं? शत्रू कसा ओळखावा? आदर्श पत्नी कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षण काय असतात? पतीची काय कर्तव्य आहेत. राजाने राज्य कारभार कसा करावा? आयुष्य जगत असताना काय करावं? कोणत्या गोष्टी कराव्यात आणी कोणत्या गोष्टी करू नयेत? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये माहिती दिली आहे.
आर्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी आणि युक्ती सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात तुम्ही जर या मार्गानं गेलात तर तुमचा मित्रच काय पण शत्रू देखील तुम्हाला अपेक्षित असलेलाच व्यवहार करेल. तुम्ही तुमच्या शत्रूकडून देखील तुमचं काम करूवून घेऊ शकता, जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते.
आधी व्यक्तीला समजून घ्या
चाणक्य म्हणतात तुम्हाला ज्या व्यक्तीकडून तुमचं काम करून घ्यायचं आहे, त्याला आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? त्याला कोणत्या गोष्टीत आनंद वाटतो, त्याला कोणत्या गोष्टीमुळे वाईट वाटू शकते. त्याला कोणत्या गोष्टी आवडतात या सर्व गोष्टींची माहिती घ्या असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
त्याचं कौतुक करा
आर्य चाणक्य म्हणतात की जागतील कोणताही व्यक्ती असो त्याला आपलं कौतुक आवडतं त्यामुळे तुमचा विचार त्याच्यासमोर मांडण्यापूर्वी त्याचं कौतुक करा. त्यामुळे ती व्यक्ती तुमच्यावर प्रभावीत होईल, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुम्हाला हवं असलेलं काम त्याच्याकडून सहज करून घेऊ शकता.
त्याच्याच भाषेमध्ये त्याच्याशी बोला
याचा अर्थ असा होता की, समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे, हे आधी समजून घ्या, तो कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, हे माहिती करून घ्या, आणि त्याच्याच कलेनं त्याच्याशी संवाद साधा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.
