AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच

मराठी भाषेत एक म्हण आहे पळसाला पाने तीनच किंवा घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ असा की जी आपल्या घरी परिस्थिती असते तीच प्रत्येकाच्या घरात सुद्धा असते. जवळपास सर्वांच्याच घरात काही न काही कारणामुळे वाद होत असतात. अनेकदा पती-पत्नीचं पटत नाही. असे प्रसंग घडू नये यासाठी चाणक्य यांनी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 9:21 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श कुटुंब कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचसोबत घरातील कुटुंबप्रमुखाची कर्तव्य काय आहेत? पत्नीची कर्तव्य काय आहेत? मुलांची कर्तव्य काय आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्ट चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्या आहेत. चाणक्य म्हणतात कुटुंबातील प्रत्येक घटक आपल्या मर्यादा ओळखून आणि कर्तव्य लक्षात घेऊन समोरच्या व्यक्तीसोबत व्यवहार करतो, तेव्हा घरात कधीही वादविवादाचे प्रसंग उद्भवत नाहीत आणि घर शातं राहतं. पुढे चाणक्य असेही म्हणतात ज्या घरात सतत भांडणं होतात, घर अशांत असतं अशा घरात कधीही पैसा टिकत नाही. घरा शांत रहावं वादविवाद होऊ नये यासाठी चाणक्य यांनी काही उपाय सांगितले आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती जाऊन घेऊयात.

जीभेवर नियंत्रण – चाणक्य म्हणतात तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला मारहाण केली तर ती जखम काळाच्या ओघात भरू निघते, मात्र तुम्ही जेव्हा बोलून एखाद्या व्यक्तीला दु:खी करता, तेव्हा ती जखम आयुष्यात कधीही भरू निघत नाही. जीभेनं केलेली जखम कधीही भरून निघत नाही. त्यामुळे आपला आपल्या जीभेवर ताबा हवा. माणसानं नेहमी जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा असा सल्ला चाणक्य देतात.

आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तींचा आदर करा – चाणक्य म्हणतात जे व्यक्ती आपल्यापेक्षा वयानं मोठे आहेत, अशा लोकांचा आदर करा. कारण त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा खूप मोठा असतो. ज्या घरात वृद्ध व्यक्तीचा सन्मान केला जातो, अशा घरात कधीही वादविवादाचे प्रसंग निर्माण होत नाहीत.

समाधान – चाणक्य म्हणतात तुम्हाला जे मिळालं आहे, त्यात समाधान ठेवा. मन शांत ठेवा, त्यामुळे घरात कधीही भांडणं होणार नाहीत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा