Chanakya Niti : मुलांना यशस्वी आणि जबाबदार व्यक्ती झालेलं पाहायचंय? मग या पाच गोष्टी त्यांना शिकवाच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की आपलं मुलं आयुष्यात यशस्वी झालं पाहिजे, जबाबदार बनलं पाहिजे, ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. परंतु त्यासाठी मुलांना त्यांच्या लहानपणी काही गोष्टींची जाणीव करून देणं गरजेचं आहे.

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की आपलं मुलं त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावं, त्याने एक जबाबदार नागरिक बनावं, आपलं नाव उज्जवल करावं. अशी जगातील प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. तुमची मुलं पुढे चालून त्यांच्या आयुष्यात काय करणार? हे तुम्ही त्यांची जडणघडण कशी करता, त्यांच्यावर कसे संस्कार करतात? त्यावर अवलंबून असतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे असंही म्हणतात की जगात अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही मुलांना शिकवल्याच पाहिजे. जर तुम्ही तुमची मुलं लहान असताना या गोष्टी त्यांना शिकवल्या तर तुमची मुलं मनाने अधिक कणखर बनतात. त्यांच्या आयुष्यात येणार्या प्रत्येक संकटाचा सामना ते मोठ्या हिंमतीने करतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
मित्र ओळखायला शिकवा – चाणक्य म्हणतात या जगात तुमची संगत कशी आहे? त्यावरच तुमचं भविष्य कसं असणार हे अवलंबून असतं. त्यामुळे तुमच्या मुलांची संगत ही नेहमी चांगली असेल याकडे कटाक्षाने लक्ष द्या. जर तुमच्या मुलांची संगत ही चांगली असेल तर तुमचं मुलं आयुष्यात नक्कीच प्रगती करेल, त्यामुळे त्याला आयुष्यात मित्र ओळखायला शिकवा.
संयम – चाणक्य म्हणतात आयुष्यात संयम हा खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे तुमच्या मुलांना संयम शिकवा, त्याने जर तुमच्याकडे एखाद्या वस्तूचा हट्ट धरला तर ती वस्तू त्याला लगेच देऊ नका, त्या वस्तूसाठी संघर्ष करायला त्याला शिकवा, जर तुम्ही ती वस्तू त्याला लगेच दिली तर तो त्याच्या आयुष्यात संयम कधीच शिकू शकणार नाही.
लोकांचा विचार – मुलंच नाही तर आपण देखील नेहमी चार लोक आपल्याला काय म्हणतील? याचा विचार करत असतो. परंतु मुळात हा विचारच निरर्थक असतो. त्यामुळे कोणाला किती महत्त्व द्यायचं हे मुलांना शिकवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
कष्ट – चाणक्य म्हणतात मुलांना हे देखील शिकवा की आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो, प्रचंड कष्ट करावे लागतात. कोणतीही गोष्ट या जगात फुकट मिळत नाही. तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासूनच कष्टाळू बनवा, श्रमप्रतिष्ठा त्याच्या अंगात रुजवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
गरजू व्यक्तींना मदत – चाणक्य म्हणतात जे लोक अडले आहेत, ज्यांना गरज आहे, अशा लोकांना मदत करावी, हे देखील आपल्या मुलांना शिकवा. आपण समजाचं काहीतरी देणं लागतो, हा विचार त्याच्या मनात निर्माण करा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
