AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” याच आशयाने आचार्य चाणक्यांनी सांगितले कर्माचे महत्त्व

तुमचे कर्म असते तुम्हाला फळ देखील तसेच मिळते. तुम्ही तुमच्या वयाने नाही तर कृतीने मोठे होता या गोष्टीवर चाणक्यांचे ठाम मत होते.

Chanakya Niti : जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर याच आशयाने आचार्य चाणक्यांनी सांगितले कर्माचे महत्त्व
chankaya niti
| Updated on: Feb 05, 2022 | 8:03 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे अत्यंत ज्ञानी म्हणून स्मरणात आहेत. सर्वोत्तम जीवन प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. आचार्यांचे शब्द आजच्या काळातही लागू होतात. आचार्य एक कार्यक्षम राजकारणी, मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते होते. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये (Chankaya Niti) माणसाला आयुष्य शिकवणाऱ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्या गोष्टी आत्मसात केल्यास आपल्याला कोणीही फसवू शकत नाही. आचार्यांच्या मते तुमचे कर्म (Karma )तुमचे भविष्य ठरवत असते. जसे तुमचे कर्म असते तुम्हाला फळ देखील तसेच मिळते. तुम्ही तुमच्या वयाने नाही तर कृतीने मोठे होता या गोष्टीवर चाणक्यांचे ठाम मत होते. सहसा लोक वय पाहून मोठे किंवा लहान कोण हे सांगतात, पण आचार्य चाणक्य यांना हे मान्य नव्हते . त्यांनी चाणक्य नीतीमध्ये कृतींना मोठे स्थान दिले आहे. मोठे होण्यासाठी तुम्हाला मोठ्या गोष्टी करणे आवश्यक आहे.खरेतर, व्यक्तीच्या कृतीमुळेच तो मोठा होतो . मोठी कर्मे करण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. एखाद्याने त्याच्या कृतीकडे सतत लक्ष दिले पाहिजे. मृत्यूनंतर लोक तुमची आठवण फक्त कर्माने करतात. असे लोक मृत्यूनंतरही आपली ओळख दीर्घकाळ टिकवून ठेवतात आणि इतरांसाठी प्रेरणा बनतात.

आचार्य चाणक्या कर्मांबद्दल म्हणतात…

1. आचार्यांच्या मते ज्याप्रकारे पर्वत वीज पडून तोडतो, तर तो पर्वताइतका मोठा नसतो. त्याचप्रमाणे, व्यक्तीचे मोठे कर्तृत्व त्याला मोठे बनवते, व्यक्तीचे वय किंवा आकार नाही.

2. आचार्यां म्हणतात काही कर्मे सांगितली आहेत, ज्यामुळे माणूस महान होतो. यापैकी एक कर्म म्हणजे दान. दानामुळे तुम्ही गरजू लोकांना मदत करता. कर्ण आणि बळी यांचे नाव केवळ त्यांच्या दानधर्मामुळेच काढले जाते. परोपकाराचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर मधमाशांकडे बघा, त्या सर्व मध स्वत:साठी बनवतात, पण त्याचा जास्त फायदा त्यांना होत नाही. तसेच जो माणूस फक्त स्वतःसाठी जगतो, तो ना स्वतः आनंदी राहू शकतो, ना इतरांना आनंदी ठेवू शकतो. शेवटी, तो स्वतःच सर्वकाही गमावतो.

3. चांगुलपणा माणसाच्या स्वभावात असतो, तो कोणामध्ये टाकला जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीचे शब्द, आचरण, धैर्य, सद्गुण आणि औदार्य त्यांच्या स्वतःच्या गुणांसाठी बोलतात.

4. फसवणूक करणारा हा अधार्मिक राजासारखा असतो. जो फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो आणि समाज सोडून इतर समाजात मिसळतो. अशी व्यक्ती स्वतःच स्वतःचे नुकसान करते.

संबंधीत बातम्या :

05 February 2022 Panchang | 5 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या वसंत पंचमीचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

vasant Panchami 2022 | वसंत पंचमीच्या उपवासावेळी चुकूनही ‘ही’ कामे करु नका…नाहीतर

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ते बाबा महाराज सातारकर… प्रसिद्ध कीर्तनकाराचा 86 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.