AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे तीन लोक आयुष्यभर गरीबच राहतात; आर्य चाणक्यांनी काय सांगितलंय?

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : हे तीन लोक आयुष्यभर गरीबच राहतात; आर्य चाणक्यांनी काय सांगितलंय?
| Updated on: May 01, 2025 | 1:12 AM
Share

आर्य चाणक्य हे महान विद्वान, राजनितीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, कुटनीतीतज्ज्ञ आणि विचारवंत होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रथांमध्ये व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी चाणक्य यांनी सांगितल्या आहेत. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये व्यक्तीनं आयुष्य कसं जगावं? आयुष्यात काय करावं? काय करू नये? आदर्श पत्नी कशी असावी? आदर्श पत्नीची लक्षण काय आहेत. आदर्श पती कोणाला म्हणावं? आपला खरा मित्र कसा ओळखावा, आपला शत्रू कोण? अशा मनुष्य हिताच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहे.

आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रथांमध्ये सांगितलं आहे की, जर व्यक्ती सतत काम करत असेल तर तो लवकरच श्रीमंत होतो. मात्र जे लोक आळशी असतात. ज्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणा नसतो, तसेज ज्यांना वेळीची किंमत नसते असे लोक आयुष्यभर गरीब राहतात, त्यामुळे मनुष्यानं या गोष्टींचा त्याग केला पाहिजे असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य काय सांगतात? 

आर्य चाणक्य म्हणतात जे लोक आळशी असतात, कुठलाही काम धंदा करत नाहीत, ज्यांची नजर सतत आयत्या मिळणाऱ्या गोष्टींवर असते. असे लोक आपल्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत, असे लोक कायम गरीब राहतात.

तसेच ज्या लोकांना वेळीची किंमत नसते, असे लोक देखील कधीच प्रगती करत नाहीत. कारण असे लोक नेहीमी वेळ निघून गेल्यानंतर निर्णय घेतात किंवा काम करतात. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, आणि वेळ निघून गेल्यानंतर केलेलं काम हे व्यर्थ असतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

प्रामाणिकपणा – आर्य चाणक्य म्हणतात जर व्यक्ती आपल्या कामामध्ये प्रामाणिक नसेल तर त्यांचं काम कधीही परीपूर्ण होणार नाही. असे लोक प्रत्येक काम अपूर्ण करतात. याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही कोणतंही काम करत असाल ते काम प्रामाणिकपणे करा असा सल्ला आर्य चाणक्य देतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...