Mauni Amavasya 2022 | मौनी अमावास्येच्या दिवशी ‘ही’7 कामे चुकूनही करु नका, अन्यथा पितृदोष निर्माण होईल

Mauni Amavasya 2022 | मौनी अमावास्येच्या दिवशी ‘ही’7 कामे चुकूनही करु नका, अन्यथा पितृदोष निर्माण होईल
mauni amavasya

जी अमावस्या सोमवारी (Monday) येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात. अमावास्या अशुभ असते, असे मानले जाते. मात्र, तसे नाही. अमावास्येला अनन्य साधारण महत्त्व असते आणि त्याचा लाभही होतो. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 23, 2022 | 1:34 PM

मुंबई : जी अमावस्या सोमवारी (Monday) येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात. अमावास्या अशुभ असते, असे मानले जाते. मात्र, तसे नाही. अमावास्येला अनन्य साधारण महत्त्व असते आणि त्याचा लाभही होतो. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. हिंदू (Hindu)धर्मग्रंथांमध्ये सोमवती अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते . सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास, उपासना आणि गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे .(Mauni Amavasya 2021 never do this things on this amavasya).

मौनी अमावास्येच्या दिवशी करू नयेत ‘ही’ कामे!
– दिवसा उशिरापर्यंत झोपू नका. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्याची परंपरा आहे. जर तुम्हाला पवित्र नदीत अंघोळ करणे शक्य नसेल, तर घरीच स्वच्छ आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर सूर्य अर्ध्य देण्यास विसरू नका. आंघोळ करण्यापूर्वी काही बोलू नका, शांत रहा. (Mauni Amavasya 2022 never do this things on this amavasya).

– अमावस्येला स्मशानभूमीत किंवा स्मशानभूमीतच्या आसपासच्या परिसरात फिरता कामा नये. अमावस्याची रात्र ही काळोखी रात्र आहे, असे म्हटले जाते. असे मानले जाते की यावेळेस भुते किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात. म्हणूनच, अमावस्येच्या रात्री एकाकी जागी जाऊ नये

– अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. परंतु, शनिवारशिवाय इतर कोणत्याही दिवशी पिंपळाला स्पर्श करू नका, म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, पण झाडाला स्पर्श करू नका. यामुळे आर्थिक नुकसान होते.

– अमावस्येच्या दिवशी स्वतःवर संयम ठेवला पाहिजे. या दिवशी पुरुष आणि स्त्रीने संभोग करू नये. गरुड पुराणानुसार अमावस्येच्या दिवशी लैंगिक संबंधातून जन्मलेल्या मुलांना आयुष्यभर आनंद मिळत नाही. अमावस्येच्या दिवशी घरात शांततेचे वातावरण असले पाहिजे. आज ज्या घरात वादाचे वातावरण आहे, तेथे पितरांची कृपा होत नाही. या दिवशी भांडणे, कलह आणि वादविवाद टाळले पाहिजेत. या दिवशी वाईट शब्द मुळीच बोलू नयेत.

– या दिवशी एखाद्याने पलंगावर नव्हे, तर चटईवर झोपावे. अमावस्येच्या दिवशी शरीरावर तेल लावण्यास मनाई आहे. आपण मौनी अमावस्येला बाहेर जात असाल, तर या दिवशी कोणत्याही प्रकारचा मेकअप करू नका.

– या दिवशी, मद्य, मांस इत्यादीपासून दूर रहा आणि साधे सात्विक अन्न खा.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या : 

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेले ‘हे’ 5 मंत्र आत्मसात करा, कोणतंही काम चुटकीसरशी पूर्ण होणार

Astro Remedy | लग्न जमत नाही आहे? वास्तूशास्त्रात सांगितलेले ‘हे’ 5 उपाय करुन तर बघा

23 January 2022 Panchang | 23 जानेवारी 2022, रविवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें