जोडीदाराशी सतत लहान-लहान गोष्टींवरुन वाद होत असतील तर हे 5 ज्योतिषीय उपाय करा

जोडीदाराशी सतत लहान-लहान गोष्टींवरुन वाद होत असतील तर हे 5 ज्योतिषीय उपाय करा
Couple Fight

प्रत्येकाला आपले विवाहित जीवन खूप चांगले घालवायचे असते (astrological remedies), परंतु प्रत्येकाच्या बाबतीत असे घडत नाही. कधीकधी पती-पत्नीला एकाच छताखाली राहणे कठीण होते. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन अनावश्यक वाद होतात. जरी नंतर चूक कळली, परंतु तोपर्यंत घराचे वातावरण खराब होते

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jul 09, 2021 | 1:27 PM

मुंबई : प्रत्येकाला आपले विवाहित जीवन खूप चांगले घालवायचे असते (astrological remedies), परंतु प्रत्येकाच्या बाबतीत असे घडत नाही. कधीकधी पती-पत्नीला एकाच छताखाली राहणे कठीण होते. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन अनावश्यक वाद होतात. जरी नंतर चूक कळली, परंतु तोपर्यंत घराचे वातावरण खराब होते (Do these five astrological remedies to stop quarrel between couple).

जास्त भांडणामुळे पती-पत्नी एकतर एकमेकांशी कमी बोलतात किंवा गोष्टी लपवण्यास सुरुवात करतात. यामुळे, या दोघांमध्ये अधिक चांगली बॉन्डिंग होऊ शकत नाही. कधीकधी या छोट्या-छोट्या गोष्टी इतका मोठा स्वरुप घेतात की घटस्फोटाची वेळ येते. परंतु आपल्याला माहित आहे का की, कधीकधी या भांडणाचे कारण घराची नकारात्मकता देखील असते. येथे जाणून घ्या असे काही ज्योतिषीय उपाय जे आपल्या घराची नकारात्मकता दूर करण्यात तसेच आपले संबंध सुधारण्यास मदत करतील.

हे ज्योतिषीय उपाय मदत करतील

1. स्वयंपाक करताना पहिली पोळी बाजूला ठेवा आणि त्याचे चार समान भाग करा. पहिला भाग गायीला, दुसरा कुत्र्याला, तिसरा कावळ्याला किंवा कोणत्याही पक्षाला आणि चौथा भाग चौकात ठेवा. काही दिवस सातत्याने हा उपाय करा. याने आपल्या वैवाहिक जीवनातील गुंतागुंत बर्‍याच प्रमाणात कमी होतील.

2. भगवान शिव आणि देवी पार्वतीची नियमित पूजा करावी. श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि सकाळी पांढरी फुले अर्पण करावी. यानंतर “ॐ पार्वतीपतये नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करा.

3. आपल्या बेडरुमच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि घरात मसालेदार बनवण्याची आणि खाण्याची सवय कमी करा. बेडरुममध्ये राधा कृष्णाचे छायाचित्र लावा, परंतु या चित्रात त्यांच्याबरोबर इतर कोणत्याही गोपीका असू नयेत.

4. रविवारी रात्री दुधाने भरलेला चांदीचा ग्लास आपल्या डोक्याजवळ ठेवा आणि सकाळी बाभूळीच्या झाडाला ते दूध अर्पण करा. याशिवाय, आपल्या लग्नाचे फोटो लाल चौकटीत फ्रेम करुन आणि ते आपल्या खोलीत ठेवा.

5. सोमवारी किंवा शनिवारी गव्हाचे पीठ दळून आणा, त्यामध्ये काळा हरभरा मिक्स करा. त्याची चपाती बनवून खाल्ल्यास घरातील त्रास मिटतात. त्याशिवाय, घराची पूर्वेकडील किंवा उत्तर दिशेला तुळशी ठेवा. यामुळे घराचे वास्तुदोष दूर होतात.

Do these five astrological remedies to stop quarrel between couple

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Friday Astro Tips | ‘या’ आजारांसाठी शुक्र ग्रह असतो जबाबदार, ग्रहदोष मुक्तीसाठी हे उपाय करा

Thursday Astro Tips | कुंडलीत गुरु दोष असेल तर गुरुवारी हे उपाय करा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें