AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला करा असे उपाय, मिळवा साडेसाती आणि शनिच्या दृष्टीतून दिलासा, जाणून घ्या

शनिदेव हनुमान भक्तांना त्रास देत नाहीत असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे शनि पीडिने त्रस्त जातक मारुतीरायाच्या चरणात आश्रय घेतात. ज्योतिषशास्त्रात हनुमान जयंती दिवशी करावयाचे उपाय सांगण्यात आले आहेत.

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला करा असे उपाय, मिळवा साडेसाती आणि शनिच्या दृष्टीतून दिलासा, जाणून घ्या
संकटमोचक हनुमानाची जयंतीला करा अशी पूजा, शनि साडेसाती आणि अडीचकीत मिळेल दिलासा
| Updated on: Apr 04, 2023 | 4:15 PM
Share

मुंबई – हिंदू पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेला दरवर्षी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे. यंदा हनुमान जयंती 6 एप्रिल 2023 रोजी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान भक्तांना शनिदेव त्रास देत नाही. त्यामुळे शनि साडेसाती, अडीचकी आणि महादशेच्या प्रभावाखाली असलेल्या जातकांसाठी हा दिवस खास असणार आहे. हनुमान जयंतीली काही खास उपास केल्यास यातून दिलासा मिळतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. चला जाणून घेऊयात या उपायांबाबत

हनुमान जयंतीला करावयाचे ज्योतिषीय उपाय

शनि पीडितेतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास धरा. लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जा. मूर्तीसमोर कुशच्या आसनावर बसून जाईचं तेलचा दिवा लावा. हनुमान चालीसेच 11 वेळा पाठ करा.

हनुमानाला चणे आणि बुंदीच्या लाडूंचा भोग खूप प्रिय आहे. या दिवशी नक्कीच मारुतिरायाला या पदार्थांचा नैवेद्य दाखवा. सुंदरकांडचं पठण करा आणि प्रसाद वाटा. या उपायामुळे शनिच्या पीडा कमी होते आणि उत्तम आरोग्य लाभतं.

शनि साडेसाती आणि अडीचकीतून दिलासा मिळवण्यासठी हनुमानाला सिंदूर, चोळा आणि जुईचं तेल अर्पण करा. वडाची आठ पानं काळ्या धाग्यात बांदून त्यावर सिंदूरने राम-राम लिहा. ही पानं हनुमानाच्या मंदिरात अर्पित करा. या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका करतात.

शनिच्या दृष्टीतून सुटका करण्यासाठी हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी हनुमान मंदिरात नारळ न्या. हनुमानासमोरच आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतारा करा आणि तिथेच फोडा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून ‘ॐ हं हनुमते नमः’ या मंत्राचा जप करा आणि सुंदरकांडचं पठण करा.

हनुमान जयंतीला लवंग टाकून पानांचा विडा अर्पण करा. दुसरीकडे काळ्या कपड्यात बदाम बांधून घराच्या दक्षिण बाजूला लपवून ठेवा. कोणाला कळणार नाही याची काळजी घ्या. दुसऱ्या दिवशी शनि मंदिरात सोडून या. यामुळ शनिच्या दृष्टीतून मुक्ती मिळते.

हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यात दोन लवंग टाका. या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमानअष्टक वाचावा. त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलांची माळ, लाल चंदन अर्पण करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.