Surya Grahan 2021 | सूर्यग्रहणामुळे नैसर्गिक आपत्तींची भीती, चंद्राशी संबंधित राशींच्या व्यक्तींनी खबरदारी घ्यावी

धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या ग्रहणाला (First Surya Grahan 2021) एक महत्वाची घटना मानली जाते. ग्रहणकाळात राहू-केतूचा प्रभाव वाढतो आणि सूर्य, चंद्राचा प्रभाव कमी होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. जेव्हा राहू-केतूचा वाईट प्रभाव सूर्यावर होतो, त्यानंतर तो सूर्यग्रहण होते तेव्हा आणि चंद्रावर प्रभाव वाढतो तेव्हा चंद्रग्रहण होते.

Surya Grahan 2021 | सूर्यग्रहणामुळे नैसर्गिक आपत्तींची भीती, चंद्राशी संबंधित राशींच्या व्यक्तींनी खबरदारी घ्यावी
Solar Eclipse

मुंबई : धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या ग्रहणाला (First Surya Grahan 2021) एक महत्वाची घटना मानली जाते. ग्रहणकाळात राहू-केतूचा प्रभाव वाढतो आणि सूर्य, चंद्राचा प्रभाव कमी होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. जेव्हा राहू-केतूचा वाईट प्रभाव सूर्यावर होतो, त्यानंतर तो सूर्यग्रहण होते तेव्हा आणि चंद्रावर प्रभाव वाढतो तेव्हा चंद्रग्रहण होते. ग्रहण काळात सूर्य किंवा चंद्र पीडित असतात आणि अशक्त होतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावरही होतो. 2021 वर्षाचे पहिले सूर्यग्रहण गुरुवारी 10 जून रोजी येत आहे (First Surya Grahan 2021 This Solar Eclipse Will Increase The Risk Of Natural Calamities).

ज्योतिषाचार्य प्रज्ञा वशिष्ठ यांच्या मते, कोरोना कालावधीत लोक आधीच घाबरले आहेत. अशा परिस्थितीत हे सूर्यग्रहण आताच्या जीवनावर काय परिणाम करेल याबद्दल त्यांच्यात भीती वाढली आहे. प्रज्ञा वशिष्ठ म्हणतात की, 10 जून रोजी सूर्यग्रहण दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनी सुरु होईल आणि संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी संपेल. पण, भारतात हे ग्रहण अर्धवट सूर्यग्रहण असेल म्हणूनच सूतकचे नियम इथे लागू होणार नाहीत आणि ग्रहणाचा विशेष परिणामही दिसणार नाही. कारण, अशी मान्यता आहे की, जिथे ग्रहण दिसते तेथे त्याचा परिणाम त्याच भागात होतो.

ग्रहणामुळे नैसर्गिक आपत्तींची भीती

भारतात हे ग्रहण काही काळ फक्त ईशान्य भागात, अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्येच दिसून येईल. त्याचवेळी, उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाच्या मोठ्या भागात अर्धवट सूर्यग्रहण दिसून येईल. ज्योतिषाचार्य प्रज्ञा वशिष्ठ म्हणतात की, ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसेल तेथे काही राजकीय उलथापालथ आणि नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. आजच्या काळामध्ये संपूर्ण जग एकमेकांशी जोडलेले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा ग्रहण जगातील सर्व भागात दिसणार नाही, तेथे ग्रहणांचा अप्रत्यक्ष परिणाम देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

चंद्राने प्रभावित राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगली पाहिजे

ज्योतिषाचार्य प्रज्ञा वशिष्ठ म्हणतात की, सूर्यग्रहणावेळी सूर्य कमकुवत असतो आणि चंद्रग्रहणावेळी चंद्र अशक्त असतो हे सर्वांना माहिती आहे. परंतु, प्रत्यक्षात चंद्र हा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्हीवेळी कमकुवत असतो. याचे कारण असे आहे की सूर्यग्रहण नेहमी अमावस्येच्या दिवशी होते आणि अमावास्येला चंद्र नेहमीच कमकुवत असतो. यावेळी सूर्यग्रहणादरम्यान सूर्यापेक्षा जास्त परिणाम चंद्रावर होणार आहे. कारण हे आंशिक ग्रहण आहे. तसेच सूर्य आणि राहू यांच्यातही काही प्रमाणात फरक आहे. या परिस्थितीत, ज्यांच्या राशींवर चंद्रावर परिणाम होतो त्यांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

काय करावं –

1. मन शांत ठेवा. यासाठी ध्यान, गायत्री मंत्र, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा फक्त ओमचा जप करावा.

2. पाण्यातून प्रवास करु नका आणि कोणत्याही प्रकारचे व्यसन करण्यास टाळा, कारण व्यसन केल्याने राहू-केतु, शनिचे दुष्परिणाम वाढवते आणि त्याचा चंद्रावरही वाईट परिणाम होतो.

3. मनात नकारात्मक किंवा अशुभ विचार येऊ देऊ नका. ग्रहण दरम्यान प्रवास टाळा.

4. हे ग्रहण वृषभ राशीत होत आहे, म्हणून सूर्य, चंद्र, राहू, बुध ग्रहणाच्या दिवशी वृषभ राशीत असतील. राहू आणि बुध या दोन्ही गोष्टींमुळे चंद्राचा परिणाम होतो, म्हणून कर्क राशीच्या व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घ्यावी.

5. उपाय म्हणून प्रत्येकाने सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्य मंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करा.

First Surya Grahan 2021 This Solar Eclipse Will Increase The Risk Of Natural Calamities

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lunar Eclipse 2021 : आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण, भारतात कुठे दिसेल, ग्रहणाची वेळ काय? जाणून घ्या

Surya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’ कुठे दिसेल आणि कसे पाहावे?