Ganesh Visarjan 2023 | गणेश विसर्जनादरम्यान मुंबईत चौपाटीवर एकाच्या अंगावर पडली वीज
Ganesh Visarjan 2023 | मुंबईत कुठल्या चौपाटीवर ही घटना घडली? मुंबईत काल विसर्जनाचा मोठा उत्साह होता. मुंबईतील मुख्य रस्ते, गल्लीबोळ ढोल-ताशाने दुमदुमून गेले होते. रस्ते गुलालाने माखले होते.

मुंबई : मुंबईत काल अनंत चतुर्दशीचा उत्साह होता. 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. काल जणू संपूर्ण मुंबईच रस्त्यावर उतरली होती. मुंबईतील मुख्य रस्ते, गल्लीबोळ ढोल-ताशाने दुमदुमून गेले होते. रस्ते गुलालाने माखले होते. सर्व चौपाट्या सुद्धा गर्दीने फुलून गेल्या होत्या. मुंबईत विसर्जनाचा उत्साह होता. या दरम्यान मुंबईत एक चटका लावणारी घटना घडली. मुंबईत गणपती विसर्जना दरम्यान एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला.
हसन युसूफ शेख अस मृत मुलाच नाव आहे. गुरुवारी 4.15 च्या सुमारास हसन युसूफ शेख किनाऱ्याजवळ पडलेला दिसला. त्याला लगेच घटनास्थळी असलेल्या रुग्णवाहिकेतून जवळच्या पालिकेच्या कुपर रुग्णालयात नेण्यात आलं. सुरुवातीला असं वाटलं की, हसन युसूफ शेखचा बुडून मृत्यू झालाय. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. आज सकाळपर्यंत विसर्जन
नंतर लक्षात आलं की, वीज अंगावर पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी आणि रात्री मुंबापुरीत विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. मुंबईत आज सकाळपर्यंत विसर्जन सुरु होतं. आज सकाळी 9 च्या सुमारास गिरगाव चौपाटीवर प्रसिद्ध लालबागच्या राजाच विसर्जन झालं. मुंबईत कालपासून हजारो घरगुती गणेशमुर्ती आणि सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाच विसर्जन करण्यात आलं.
