AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ वेळी ग्रहांची चाल काय? भारत-पाकमध्ये युद्ध होणार?

Astrologer Prediction on India-Pakistan War : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये ताण तणाव आहे. भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. अशात ग्रहांची स्थिती कशी आहे, त्याचा कोणाला फायदा होईल? याविषयी ग्रहांचे काय आहे भाकीत?

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी ग्रहांची चाल काय? भारत-पाकमध्ये युद्ध होणार?
ग्रहांची काय स्थिती, कोणाची होणार सरशी
| Updated on: May 09, 2025 | 4:33 PM
Share

जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे हल्ला केला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 मेच्या मध्यरात्री त्याचा बदला घेतला. पाकिस्तानमध्ये घुसून 9 दहशतवादी तळांवर थेट हवाई हल्ला चढवला. या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरसह लाहोर, रावळपिंडीजवळील दहशतवादी तळं नष्ट करण्यात आली. तर 100 दहशतवादी ठार केले. या धाडसी कारवाईमुळे पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. पाकिस्तानने दोन दिवसांपासून भारतीय सीमा रेषेजवळील शहरांवर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले सुरू केले आहेत. ते हवेतच नष्ट करण्यात आले आहेत. अशात ग्रहांची स्थिती कशी आहे, त्याचा कोणाला फायदा होईल? याविषयी ग्रहांचे काय आहे भाकीत?

ग्रहांची चाल काय?

7 मे 2025 रोजी रात्री 1:30 वाजता भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यावेळी ग्रहस्थिती अनुकूल होती. त्यावेळी कुंडलीत मकर लग्न स्थानात होते. मकर राशीचा स्वामी शनि देव आहे. ते कुंडलीच्या तिसर्‍या भावात विराजमान होते. तिसरा भाव हा पराक्रम, साहस आणि शेजारी देशांशी संबंध दर्शवतो. तर युद्धाचे कारक असलेले ग्रह मंगळ आणि बुध हे देखील शनिसोबतच तिसऱ्या भावात होते. शुक्र हा उच्च स्थितीत होता. एकूणच हल्ला करताना, ऑपरेशन सिंदूरवेळी ग्रहकाळ भारतासाठी अत्यंत अनुकूल, निर्णायक होता. या ग्रहयोगांमुळे भारताने ठोस पावले टाकली. ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले. . वैदिक ज्योतिषानुसार, या वर्षाची सुरुवात 6 मोठ्या ग्रहांच्या युतीने झाली आहे. ही स्थिती देशाची सुरक्षा आणि सीमेवरील तणाव दर्शवते. येत्या काळावर नजर टाकली तर हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. खासकरून मंगळ ग्रहाची स्थिती आणि गुरूचे राशी परिवर्तन यामुळे येता काळ थोडा कसोटीचा असेल.

मग आता पुढे काय?

कुंडलीत शुक्र, शनि आणि राहुची बैठक पाहिली असता, भारतापेक्षा पाकिस्तानला अधिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानकडील जीवितहानी, वित्तहानी दीर्घकाळासाठी होईल, असे दिसते. जर पाकिस्तानने आगळीक करत भारताशी युद्ध छेडले तर पाकिस्तानचे कंबरडे मोडू शकते. सध्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवरून पाकिस्तान भारताशी युद्ध करणार नाही, असे चिन्हं दिसत आहेत. पाकिस्तान तरीही कुरापती सुरूच ठेवणार आहे आणि त्याला तसाच मोठा तडाखा बसणार आहे. भारताने अजूनही यु्द्धाची घोषणा केलेली नाही.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.