AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात ‘या’ दिशेला लावा धावणाऱ्या 7 घोड्यांचे फोटो, तुमच्याकडे आकर्षित होईल सुख आणि समृद्धी

वास्तुशास्त्रानुसार घराच्या या दिशांना धावणाऱ्या 7 घोड्यांचे फोटो लावणे हे यश, शक्ती आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. चला तर मग आजच्या लेखात हा फोटो घराच्या कोणत्या दिशेला लावणे योग्य आहे ते जाणून घेऊयात.

घरात 'या' दिशेला लावा धावणाऱ्या 7 घोड्यांचे फोटो, तुमच्याकडे आकर्षित होईल सुख आणि समृद्धी
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Mar 27, 2026 | 7:14 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू आणि भिंतीवरील प्रत्येक फोटो लावण्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. सर्वात प्रभावी प्रतीकांपैकी एक म्हणजे सात धावणाऱ्या घोड्यांचं फोटो. अनेकदा लोकं याला केवळ एक सजावटीची वस्तू मानतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार हा फोटो यश, शक्ती, धैर्य आणि प्रगतीचे प्रतीक आहे. जर तुम्हालाही तुमच्या करिअर किंवा व्यवसायात जलद प्रगती हवी असेल, तर घरामध्ये या घोडयांचं फोटो लावण्याची योग्य दिशा आणि नियम नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

7 हा अंक आणि घोडयांचं महत्त्व का आहे?

हिंदू धर्म आणि अंकशास्त्रामध्ये 7 हा अंक अत्यंत शुभ मानला जातो, जसे की सप्तर्षी, इंद्रधनुष्याचे सात रंग. त्याचबरोबर, घोडा सौर ऊर्जेचे प्रतीक आहे आणि त्याचा संबंध सूर्याच्या रथाशीही जोडला जातो. धावणारे घोडे जीवनातील अदम्य यशाचे प्रतीक मानले जातात.

धावणाऱ्या 7 घोड्यांचे फोटो घरात कोणत्या दिशेला लावावे?

पूर्व – जर तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि समाजात आदर हवा असेल, तर हे फोटो तुमच्या घराच्या पूर्वदिशे कडील भिंतीवर लावा. यामुळे सरकारी कामात यश आणि आदर मिळेल.

दक्षिण दिशा – व्यवसायात ओळख मिळवण्यासाठी हे फोटो दक्षिण दिशेकडील भिंतीवर लावा. यामुळे तुमच्या कार्यस्थळी तुमचा अधिकार प्रस्थापित होईल.

उत्तर दिशा – जर तुम्हाला आर्थिक समृद्धी आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत हवे असतील, तर तुम्ही उत्तर दिशेला हा फोटो लावू शकता.

फोटो लावताना हे 5 नियम लक्षात ठेवा

घोड्यांचे तोंड नेहमी घराच्या आतल्या बाजूला असले पाहिजे. जर त्यांचे तोंड मुख्य दरवाजाकडे असेल, तर संपत्ती आणि संधींचा ओघ बाहेर पडेल.

फोटोमधील घोडे आक्रमक किंवा धमकी देणारे दिसता कामा नयेत. त्यांचे चेहरे आनंदी आणि उत्साही असावेत.

घोड्याचे फोटो पूर्ण असावे. पाय कापलेले किंवा अपूर्ण चित्र वास्तूदोष निर्माण करते.

नेहमी लगाम न घालता मोकळेपणाने धावणाऱ्या घोड्यांचे फोटो निवडा. लगामाने बांधलेले घोडे अडथळ्याचे प्रतीक मानले जातात.

फोटोच्या मागे उगवता सूर्य किंवा मोकळी मैदाने असलेले चित्र अधिकच शुभ मानले जाते. फोटोमध्ये घोड्यांना पाण्यातून किंवा चिखलातून धावताना कधीही दाखवू नये.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा