Shardiya Navratri 2021 : दुर्दैवाला सुदैवात बदलायचं असले तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या या 5 मंत्रांचा जप नक्की करा

नवरात्रीचे नऊ दिवस शक्तीचे स्वरुप दुर्गा देवीच्या विशेष पूजेचा काळ मानला जातो. शारदीय नवरात्र 2021 गुरुवार 7 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. असे म्हटले जाते की नवरात्रीच्या वेळी जर देवीसमोर प्रामाणिक अंतःकरणाने प्रार्थना केली तर ती प्रत्येक इच्छा पूर्ण करते.

Shardiya Navratri 2021 : दुर्दैवाला सुदैवात बदलायचं असले तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या या 5 मंत्रांचा जप नक्की करा
Navratri
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 05, 2021 | 2:51 PM

मुंबई : नवरात्रीचे नऊ दिवस शक्तीचे स्वरुप दुर्गा देवीच्या विशेष पूजेचा काळ मानला जातो. शारदीय नवरात्र 2021 गुरुवार 7 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. असे म्हटले जाते की नवरात्रीच्या वेळी जर देवीसमोर प्रामाणिक अंतःकरणाने प्रार्थना केली तर ती प्रत्येक इच्छा पूर्ण करते.

नवरात्री दरम्यान नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. असे मानले जाते की हे वाचल्याने देवी खूप आनंदी होईल आणि तिच्या आशीर्वादाने कुटुंबावरील सर्वात मोठे संकटही टळते. जर तुम्ही नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करु शकत नसाल तर निश्चितपणे दुर्गा सप्तशतीमध्ये असलेल्या काही विशेष मंत्रांचा जप करा. तुमचा वाईट काळ चांगल्यामध्ये बदलण्याची शक्ती या मंत्रांमध्ये आहे. सर्व समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे मंत्र जाणून घ्या –

1. आजारापासून मुक्तीसाठी

रोगानशेषानपहंसि तुष्टा, रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान्, त्वामाश्रितानां न विपन्नराणां, त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति.

जर कुटुंबातील कोणी बऱ्याच काळापासून आजारी असेल तर त्याला रोगापासून मुक्त करण्यासाठी या मंत्राच्या दोन माळांचा नियमितपणे नऊ दिवस जप करावा.

2. दुर्दैवाचे सौभाग्यात रूपांतर करण्यासाठी

देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्‌, रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि.

जर कष्ट करूनही तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नसेल, तर तुम्ही नऊ दिवस देवीच्या या मंत्रांचा जप करावा. हा शक्तिशाली मंत्र तुमचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलू शकतो.

3. हा मंत्र वाईट काळ चांगल्यामध्ये बदलतो

शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे, सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तुते.

देवी दुर्गाचा हा चमत्कारीक मंत्र तुम्हाला प्रत्येक संकटापासून दूर ठेवतो आणि तुमच्या सभोवती एक संरक्षक ढाल तयार करतो. मातृशक्तीच्या उपासनेसाठी नऊ दिवस हे जप केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात आणि तुमचे वाईट दिवसही चांगले होतात.

4. साथीच्या रोगापासून मुक्त होण्यासाठी

ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते.

दुर्गा मातेचा हा मंत्र खूप शक्तिशाली मानला जातो. त्याचा नियमित जप केल्यास साथीच्या आजारांपासून मुक्ती मिळते. हे व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रासांपासून वाचवते.

5. अपघात टाळण्यासाठी

देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोखिलस्य, प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य.

कुटुंबाला कोणत्याही अनुचित घटनेपासून वाचवण्यासाठी नऊ दिवस देवीच्या या मंत्राचा जप करावा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Navratri 2021: घटस्थापना म्हणजे काय? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि सर्व काही

Tuesday Worship Tips : मंगळवार हनुमानजींना विड्याचे पान अर्पण करा, बजरंगबली लवकर प्रसन्न होतील

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें