Thursday Astro Tips | कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या काही उपाय

बृहस्पति हा सर्वात मोठा ग्रह मानला जातो, तसेच तो देवांचा गुरु देखील आहे. असे म्हटले जाते की जर कुंडलीमध्ये बृहस्पति मजबूत स्थितीत असेल तर सर्व समस्या दूर होतात. बृहस्पति कमजोर असेल तेव्हा व्यक्तीच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. वैवाहिक जीवनात अनेक अडथळे येतात आणि वैवाहिक जीवनातही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

Thursday Astro Tips | कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या काही उपाय
कुंडलीत बृहस्पतिला बळ देतील हे ज्योतिष उपाय

मुंबई : बृहस्पति हा सर्वात मोठा ग्रह मानला जातो, तसेच तो देवांचा गुरु देखील आहे. असे म्हटले जाते की जर कुंडलीमध्ये बृहस्पति मजबूत स्थितीत असेल तर सर्व समस्या दूर होतात. बृहस्पति कमजोर असेल तेव्हा व्यक्तीच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. वैवाहिक जीवनात अनेक अडथळे येतात आणि वैवाहिक जीवनातही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

जर तुम्हाला गुरुची कृपा हवी असेल तर तुम्ही गुरुवारी काही काम करणे टाळा. ज्योतिषी डॉ अरविंद मिश्रा यांच्याकडून जाणून घ्या की कोणती कामे गुरुवारी केली जाऊ नयेत आणि बृहस्पति मजबूत करण्यासाठी काय केले पाहिजे.

या गोष्टी करणे टाळा

गुरुवारी डोके धुणे, केस कापणे, मुंडण करणे आणि नखे कापणे शास्त्रामध्ये निषिद्ध आहे. असे केल्याने पैशांशी संबंधित समस्या वाढतात आणि प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो.

गुरुवारी, आपण घराची नियमित स्वच्छता करु शकता, परंतु विशेष स्वच्छता करु नका. घराचा कचरा बाहेर फेकू नका आणि याशिवाय, या दिवशी कोणतीही घाण, कचरा साफ करणे टाळा.

गुरुवारी धोब्याला कपडे धुण्यासाठी किंवा प्रेससाठी देऊ नका. घरी देखील ते कपडे धुवू नका जे अधूनमधून धुतले जातात. पण, आपण दररोज घालणारे कपडे धुवू शकता.

बृहस्पति मजबूत करण्यासाठी या गोष्टी करा

गुरुवारी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समृद्धीचे प्रतीक आहेत. शक्य असल्यास, गुरुवारची कथा देखील वाचा. यामुळे विवाहित जीवन सुखी होते आणि आनंद आणि समृद्धी कायम राहते.

गव्हाच्या पीठात चण्याची डाळ, गूळ आणि हळद घालून गाईला खायला द्या. आंघोळीच्या वेळी पाण्यात एक चिमूटभर हळद घाला.

गरीबांना त्यांच्या क्षमतेनुसार चणा डाळ, केळी, पिवळे कपडे इत्यादी दान करा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

पाचू रत्न धारण केल्यामुळे तुम्हाला दिसतील हे शुभ परिणाम; सविस्तर जाणून घ्या विधी आणि नियम

What says your thumb : अतिशय रागीट आणि अहंकारी असतात असे अंगठे असलेले लोक, विचारपूर्वक करा यांच्याशी मैत्री

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI