AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराच्या दाराला उंबरठा का असतो आवश्यक? ‘या’ 5 गोष्टींची कायम घ्या काळजी, नाहीतर…

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगितलं आहे. शास्त्र उंबरठ्याचं देखील महत्त्व सांगितलं आहे. अनेक जण उंबरठ्याची पूजा देखील करतात. पण उंबरठ्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं... तर जाणून घ्या कोणत्या 5 गोष्टींचा काळजी घेणं गरजेचं आहे.

घराच्या दाराला उंबरठा का असतो आवश्यक? 'या' 5 गोष्टींची कायम घ्या काळजी, नाहीतर...
| Updated on: Aug 03, 2026 | 3:33 PM
Share

हिंदू धर्मात घराच्या दाराला उंबरठ्याला फार महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशाचा मुख्य ठिकाण मानला जातो. म्हणूनच मुख्य दरवाजावर बांधलेल्या उंबरठ्याला विशेष महत्त्व दिलं जातं. मात्र आधुनिक काळात दरवाजावर उंबरठा बनवण्याची परंपरा नाहीशी झाली आहे. ग्रामीण भारतातही आता हे फार कमी घरांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे जाणून घ्या उंबरठ्याचे महत्त्व आणि वास्तुशास्त्रानुसार घराच्या आसपास कोणत्या गोष्टी नसाव्यात.

उंबरठ्याचे महत्त्व काय आहे?

वास्तुशास्त्राने घराच्या मुख्य दरवाजावर बांधलेल्या उंबरठ्याला विशेष महत्त्व दिलं आहे. असं मानलं जातं की, योग्य उंचीचा उंबरठा आणि त्याच्या सभोवतालचं स्वच्छ व संतुलित वातावरण घरात शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यास मदत करतं. उंबरठा नकारात्मक ऊर्जेला घरात प्रवेश करण्यापासून रोखतो. याच कारणामुळे प्राचीन काळी, जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात उंबरठा बांधला जात असे.

या 5 गोष्टी घराच्या आसपास नसाव्यात

काटेरी झाडे टाळा: वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काटेरी झाडं लावणं शुभ मानलं जात नाही. असं मानलं जातं की, यामुळे कुटुंबात तणाव, मतभेद आणि दुरावा वाढू शकतो. जर अशी झाडं घराच्या आसपास लावली असतील, तर ती काढून टाकली पाहिजेत.

दुधासारखा रस सोडणारी झाडे लावू नयेत: वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजासमोर पांढरा दुधासारखा रस सोडणारी झाडे लावू नयेत. असं मानलं जातं की, यामुळे कुटुंबात वाद आणि आर्थिक अस्थिरता वाढू शकते. अशी झाडं मुळासकट उपटून फेकून देणं अधिक चांगले मानलं जातं.

दगडांचे ढिग ठेवू नका: घरासमोर दगडांचा किंवा कचऱ्याचा ढिग बराच काळ तसाच ठेवल्यास ते वास्तूच्या दृष्टीनेही शुभ मानलं जात नाही. अशी परिस्थिती कामात अडथळे आणि मंद प्रगतीशी संबंधित मानली जाते.

कचरापेटी योग्य ठिकाणी ठेवा: वास्तूनुसार मुख्य दरवाजासमोर कचरापेटी ठेवणं शुभ मानलं जात नाही. असं मानलं जातं की यामुळे घराभोवती नकारात्मकतेचं वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यामुळे, कचरापेटी स्वच्छ आणि योग्य ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

मोठे झाड: वास्तूशास्त्रानुसार, घरासमोरच खूप उंच आणि जाड झाड असल्यास ते अशुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की यामुळे घरात पुरेसा प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही वास्तूच्या तत्त्वांवर विश्वास ठेवत असाल, तर घर बांधताना या गोष्टी लक्षात ठेवणे फायदेशीर ठरू शकतं.

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Follow Us
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय पकडले अन्...
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय धरले अन्... नागपूरात मोठ्या घडामोडी
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
Girish Mahajan | नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर...
मोठी बातमी! जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचा दणका
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30...
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30 वर्षांपासून...  बिहार पोटनिवडणूकीत सर्वात मोठा उलटफेर?
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा,
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा, नाव न घेताच...
CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच
मोठी राजकीय घडामोड! CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच शिक्कामोर्तब?
महिला कुस्तीपटू प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; 6 गंभीर...
6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले भाजप नेते बृजभूषण शरण सिंहंची निर्दोष मुक्तता
भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा...
मोठी घडामोड! भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची पंकजा मुंडे यांना थेट ऑफर
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला...
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला 15 हजारांहून अधिक पर्यटक देतात भेट, पहा...
मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
Pune News | तर एकही वाचला नसता... मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल