AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : जर वारंवार तुम्हाला या गोष्टी दिसत असतील तर समजू जा लवकरच तुमचे दिवस बदलणार, तुम्ही श्रीमंत होणार

वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टींना शुभ माण्यात आलं आहे, जर अशा गोष्टी तुम्हाला वारंवार दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत, तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होणार आहेत. तुम्ही श्रीमंत होणार आहात, अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : जर वारंवार तुम्हाला या गोष्टी दिसत असतील तर समजू जा लवकरच तुमचे दिवस बदलणार, तुम्ही श्रीमंत होणार
vastu tipsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 9:42 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी या अत्यंत शुभ माण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला काही आनंदाची बातमी मिळणार असेल किंवा तुम्हाला अचानक मोठ्या धनाची प्राप्ती होणार असेल तर त्यापूर्वी काही संकेत मिळतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरात सुख समृद्धी असावी, घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हाव. आपल्याकडे पुरेसे पैसे असावेत. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्यावर असावा. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार असते, त्यापूर्वी आपल्याला काही संकेत मिळतात. जर तुम्हालाही हे संकेत मिळत असतील तर समजून जा लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत. तुम्ही श्रीमंत होणार आहात. चला तर मग अशाच काही संकेतांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

वारंवार मुंग्या दिसणं – जर वारंवार तुमच्या घरात मुंग्या निघत असतील, मुंग्यांची रांग लागलेली असेल तर समजू जा लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत. हा एक अत्यंत शुभ संकेत असतो. जर तुम्हाला तुमच्या घरात वारंवार मुंग्या दिसत असतील तर याचा अर्थ तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार असून, तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होणार आहोत. जर तुमच्या घरात मुंग्या निघत असतील तर त्यांना मारू नका, त्याऐवजी त्यांना थोडीशी कणिक आणि गूळ देणं हे अत्यंत शुभ मानलं जातं.

लाल साडी घातलेली महिला – जर तुम्हाला वारंवार लाल साडी घातलेली महिला दिसत असेल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते, याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे. तुमचे दिवस बदलणार आहेत.

माजंरीची पिल्लं – जर तुमच्या घरामध्ये मांजरीने पिल्लांना जन्म दिला, किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या परिसरामध्ये मांजरीचे पिल्ल दिसत असतील तर हा देखील एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा की लवकच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार असून, तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होणार आहोत. त्यामुळे कधीही अशा पिल्लांना घरातून बाहेर काढू नका, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

स्वप्न – जर तुम्हाला स्वप्नात गरुड पक्षी किंवा गंगा नदी दिसली तर समजून जा की तुमचे दिवस आता लवकरच बदलणार आहेत, तुमच्या आयुष्यात अकस्मात मोठ्या धनाचा योग आहे. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होणार आहे, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड