AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : या वस्तू दान करणं म्हणजे महापुण्य, सर्व कष्ट होतात दूर, घरात येते आर्थिक स्थिरता

हिंदू धर्मशास्त्र तसेच वास्तुशास्त्रामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. आपण जेव्हा एखद्या गरजू व्यक्तीला दान करतो, तेव्हा आपल्याला पुण्याची प्राप्ती होते, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच विशिष्ट दिवशी विशिष्ट गोष्टींचं दान केल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होऊन तुमच्या घराला आर्थिक स्थिरता प्राप्त होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

Vastushastra : या वस्तू दान करणं म्हणजे महापुण्य, सर्व कष्ट होतात दूर, घरात येते आर्थिक स्थिरता
vastushastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 25, 2026 | 8:56 PM
Share

हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व आहे. तसेच वास्तुशास्त्रात देखील दानाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण गरजू व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं दान करतो, तेव्हा आपल्याला पुण्य तरच मिळतंच परंतु त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तो देखील दूर होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तुम्हाला विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. जसं की काहीही कारण नसताना घरात कलह वाढतो, पती-पत्नीचं पटत नाही. एवढंच नाही तर घरात आर्थिक स्थिरता नसते, हातात आलेला पैसा लगेच खर्च होतो. परंतु तुम्ही जेव्हा दान करतात, तेव्हा तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात, आणि पितृदोष दूर होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच वास्तुशास्त्रात कोणत्या वारी काय दान करावं? याबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं कय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

मीठ दान करा – वास्तुशास्त्रानुसार जीथे देवाचा भंडारा होतो, तिथे मीठ दान करावं. भंडाऱ्यामध्ये मीठ दान केल्यास तुमच्या घरात कधीही अन्न-धान्याचा तुटवडा निर्माण होत नाही, घर सतत अन्न धान्याने भरलेलं राहतं. तुमच्या घराला आर्थिक स्थिरता प्राप्त होते. प्रगतीच्या नवीन संधी मिळतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे भंडाऱ्याच्या ठिकाणी मीठ दान केलं पाहिजे.

मंदिरात दिवा दान करा – जर काहीही कारण नसताना तुमच्या घरात साखरे भांडण होऊ लागले, पती-पत्नीचं पटत नसेल तर यावर वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे मंदिरात दिवा दान करावा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. तसेच तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी येते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

मंगळवारी माचिस दान करा – जर तुमच्या आयुष्यात काही कष्ट असतील, तर अशावेळी मंगळवारी माचिस दान करावी, यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

आसन दान करा – जर तुमच्या मनाला शांतता लाभत नसेल, तुम्ही कुठेही एका जागी स्थिर नसाल, म्हणजे नोकरी सतत बदलण्याची वेळ तुमच्यावर येत असेल. घरात आर्थिक स्थैर्य नसेल तर अशावेळी मंदिरात आसन दान करावं, यामुळे या सर्व समस्या दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या...