AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : घरात नकारात्मक ऊर्जा आहे? कामात वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे सोपे उपाय

घरात सगळं सुरळीत सुरू असताना अचानक आपल्या आयुष्यात काही संकटं येऊ लागतात, यालाच वास्तुशास्त्राच्या भाषेत वास्तुदोष असं देखील म्हटलं जातं. जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तुमच्या आयुष्यात काही अडी अडचणी निर्माण होतात, त्यावर वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastushastra : घरात नकारात्मक ऊर्जा आहे? कामात वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे सोपे उपाय
vastu shastra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 20, 2026 | 9:04 PM
Share

अनेकदा आपल्यासोबत असं होतं की, आपलं संगळं व्यवस्थित चाललेल असतं, आपण आपल्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करतो, मात्र काही दिवसांनंतर अचानक तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही समस्या जणवायला लागतात. व्यावसायामध्ये तोटा होतो. तुम्ही प्रचंड कष्ट करतात मात्र त्या कष्टाचं अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नाही. किंवा तुम्ही सारखे आजारी पडता. हे कशामुळे घडत असेल? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर हे घडतं तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची नजर लागल्यानंतर. एखाद्याची नजर लागते म्हणजे काय? तर जेव्हा तुमची प्रगती सुरू असते, तेव्हा एखाद्याच्या मनात तुमच्याबद्दल मत्सर निर्माण होतो, असा व्यक्ती जेव्हा तुमच्याबद्दल वाईट विचार करू लागतो, तेव्हा त्याचा परिणाम हा अप्रत्यक्षरित्या तुमच्या आयुष्यावर होत असतो. तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. तुमचं आणि तुमच्या घराचं सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून संरक्षण व्हावं यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपम माहिती जाणून घेणार आहोत.

अंघोळीच्या पाण्यात थोडं मीठ टाका – जेव्हा सकाळी तुम्ही अंघोळ करता तेव्हा अंघोळीच्या पाण्यात थोड मीठ टाकावं, या उपायामुळे जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची नजर लागली असेल तर ती दूर होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. या उपायामुळे तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं वाईट नजरेपासून संरक्षण होतं, तसेच घरात जर नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल तर ती देखील दूर होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

अंघोळीच्या पाण्यात हळद टाका – जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल, किंवा तुम्ही खूप कष्ट करून देखील तुम्हाला यशाची प्राप्ती हेत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला काही आर्थिक समस्या असतील तर अशावेळी अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी, या उपायामुळे घरातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते.

गुलाब जल – जर काहीही कारण नसताना तुमच्या घरात वारंवार भाडंणं होत असतील, पती-पत्नीचं पटत नसेल तर त्यासाठी देखील वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दररोज घरातील कुटुंबप्रमुखाने किंवा पती -पत्नी दोघांनीही अंघोळीच्या पाण्यात थोडं गुलाब जल टाकून त्याने अंघोळ करावं, यामुळे घरात वादविवाद होत नाहीत, घरात शातंता राहते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर