Vat Purnima 2021 Puja : विवाहित स्त्रिया वट पौर्णिमेचं व्रत का ठेवतात? जाणून घ्या या उत्सवाबाबत सर्वकाही

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस "वटपौर्णिमा" (Vat Purnima) म्हणून साजरा केला जातो. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. अनेक ठिकाणी हे व्रत जेष्ठ अमावस्येच्या दिवसापासून ते जेष्ठ पौर्णिमेच्या तिथीपर्यंत केले जाते. वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती.

Vat Purnima 2021 Puja : विवाहित स्त्रिया वट पौर्णिमेचं व्रत का ठेवतात? जाणून घ्या या उत्सवाबाबत सर्वकाही
वट पौर्णिमा

Vat Purnima 2021 Puja : मुंबई : हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस “वटपौर्णिमा” (Vat Purnima) म्हणून साजरा केला जातो. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. अनेक ठिकाणी हे व्रत जेष्ठ अमावस्येच्या दिवसापासून ते जेष्ठ पौर्णिमेच्या तिथीपर्यंत केले जाते. वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात (Vat Purnima 2021 Shubh Muhurat Puja Vidhi And Importance).

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे तीन दिवसाचे व्रत असते. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल तर फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री उपवास सोडावा.

वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या वटवृक्षाची पूजा करुन स्त्रिया “मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य आणि मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित आणि संपन्न होऊ दे”, अशी प्रार्थना करतात.

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||

वट पौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य-

सावित्री आणि सत्यवानची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, तूप,पाच प्रकारची फळं, फुले, दिवा, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, हळद-कुंकू, पंचामृत, हिरव्या बांगड्या, शेंदूर, अत्तर, कापूर, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचे नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू

वट पौर्णिमा व्रत शुभ मुहूर्त-

– वट पौर्णिमा व्रत तिथी – 24 जून 2021

– पौर्णिमा तिथी प्रारंभ – 24 जून सकाळी 3 वाजून 32 मिनिटांपासून

– पौर्णिमा तिथी समाप्त – 25 जून सकाळी 12 वाजून 9 मिनिटांपर्यंत

पूजा कशी करावी?

जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर व्रताची सुरुवात करावी. या दिवशी श्रृंगार करावा. त्यानंतर वट वृक्षाची पूजा करावी. वडाला फुले, वाण, पाणी देत त्याभोवती परिक्रमा करावी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.

vatsavitri_pournima

वट पौर्णिमा

पौराणिक कथा

भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र आणि गुणी कन्या होती. सावित्री मोठी झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी आणि मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करु नको, असा सल्ला सावित्रीला दिला.

पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करु लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीने तीन दिवस उपवास करुन सावित्री व्रताचा आरंभ केला. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आला आणि तो जमिनीवर पडला. यमराज तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण हरु लागले. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले आणि पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला.

अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वरदान मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू-सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितले आणि आपल्याला पुत्र व्हावा असे वरदान मागितला. यमराजाने घाईघाईने तथास्तु म्हटले. काही काळाने त्याला वचनबद्ध झाल्याचे कळाले आणि सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करुन उपवास करतात आणि वट सावित्री व्रत ठेवतात.

Vat Purnima 2021 Shubh Muhurat Puja Vidhi And Importance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Bhaum Pradosh Vrat 2021 | भौम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि पूजा विधी

Nirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI