फक्त महादेवांच्या मंदिरातच तीनदा टाळी का वाजवता? तुम्हालाही माहीत नसेल याचं उत्तर
तुम्ही अनेकदा महादेवाच्या मंदिरामध्ये गेला असाल पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की फक्त महादेवांच्या मंदिरात गेल्यावरच तीनदा टाळी का वाजवता? शेकडो वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे.

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार या महिन्यामध्ये महादेवाची भक्ती भावानं पूजा केल्यास महादेवाचा आशीर्वाद सदैव आपल्या भक्तांवर राहातो. त्यामुळे श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. हा महिना सण उत्सवाचा देखील आहे. या महिन्यामध्ये अनेक सण आणि उत्सव असतात. हा महिना महादेवांना समर्पित असल्यानं या महिन्यात अनेक जण महादेवांची पूजा करतात, उपवास करतात.
तुम्ही अनेकदा महादेवाच्या मंदिरामध्ये गेला असाल पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की फक्त महादेवांच्या मंदिरात गेल्यावरच तीनदा टाळी का वाजवता? शेकडो वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे, आपणही महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तीनदा टाळी वाजवतो, आज आपण तीनदा टाळी का वाजवली जाते आणि त्याचं धार्मिक महत्त्व काय आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत.
पौराणिक मान्यतेनुसार महादेवाच्या मंदिरात तीनदा टाळी वाजवण्याचा संदर्भ हा ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचं आवाहन करण्यासोबत जोडला गेला आहे. जेव्हा भक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन तीनदा टाळी वाजवतो याचा अर्थ असा होतो की तो महादेवाच्या मंदिरात जाऊन तीन प्रमुख देव ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचं स्मरण करतो, त्यांना नमस्कार करतो.सोप्या शब्दात याचा अर्थ सांगायचा झाल्यास महादेवाच्या मंदिरात तीनदा टाळी वाजवण्याचा अर्थ भू माता, पाताळा आणि स्वर्ग, तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना नमनाचं प्रतिक मानलं जातं.
हिंदू धर्मामध्ये असंही म्हटलं आहे की, जेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन तिनदा टाळी वाजवता, त्याचा अर्थ तुमची ती महादेवांप्रति श्रद्धा असते. या प्रत्येक टाळीचा वेगळा अर्थ असतो. यामुळे भक्त आणि देव यांच्यातील संवाद वाढण्यास मदत होते. पहिल्या टाळीचा अर्थ असा होतो की भक्त देवाच्या चरणाजवळ आला आहे, दुसऱ्या टाळीचा अर्थ असा होतो की, मी देवाला प्रार्थना करतो, त्याने मला आशीर्वाद देऊन माझं सर्व दु:ख दूर करावं आणि तिसऱ्या टाळीचा अर्थ असा होतो की, मी महादेवांना शरण आलो आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
