AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: आयपीएलला मध्येच गुडबाय, रॉयल चॅलेंजर्सचे दोन खेळाडू मायदेशी परतले, कारण…

भारतात कोरोनाचा प्रकोप आणखी वाढल्यास आपल्याला ऑस्ट्रेलियाचे दरवाजे बंद होऊ शकतात, अशी भीती या खेळाडूंना असल्याचे सांगितले जाते. | IPL 2021 Coronavirus

IPL 2021: आयपीएलला मध्येच गुडबाय, रॉयल चॅलेंजर्सचे दोन खेळाडू मायदेशी परतले, कारण...
रॉयल चॅलेंजर्सला मोठा धक्का
| Updated on: Apr 26, 2021 | 12:59 PM
Share

मुंबई: इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आता कुठे रंगात येत असतानाच भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे एक-एक खेळाडू मायदेशी परतायला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) दोन खेळाडुंची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचडर्सन या दोघांनी आयपीएल स्पर्धा मध्येच सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. (Adam Zampa Kane Richardson join Andrew Tye in withdrawing from IPL 2021)

या दोघांनी वैयक्तिक कारण असल्याचे सांगत आयपीएलमधून माघार घेत असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या संघात असणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टाय यानेही IPL 2021 स्पर्धेतून माघार घेतली होती. भारतात कोरोनाचा प्रकोप आणखी वाढल्यास आपल्याला ऑस्ट्रेलियाचे दरवाजे बंद होऊ शकतात, अशी भीती या खेळाडूंना असल्याचे सांगितले जाते. रॉयल्स चॅलेंजर्सने अ‍ॅडम झम्पाला 1.5 कोटी तर केन रिचडर्सनला 4 कोटी रुपये मोजून खरेदी केले होते.

बायो बबलला कंटाळून लिव्हिंगस्टोन मायदेशी परतला

दोन दिवसांपूर्वी बायो बबलला कंटाळून राजस्थानचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन हादेखील माघारी परतला होता. बायो-बबलमध्ये मानसिक कोंडमारा होत असल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले होते.

इंग्लंडच्या संघाने गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन बिग बॅश लीगमध्ये खेळला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लियाम लिव्हिंगस्टोन हा बायो बबलमध्ये होता. बायो बबलमुळे जोश हॅझलवूड (चेन्नई), जोशुआ फिलीप (रॉयल चॅलेंजर्स), मिशेल मार्श (हैदराबाद) या खेळाडुंनी आयपीएल सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेला रामराम ठोकला होता.

चेन्नई संघासाठी आणि चाहत्यांसाठी दु:खद बातमी, अध्यक्ष एल सबारत्नम यांचं निधन

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) धूम सुरु असताना चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघासाठी आणि पाठीराख्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडचे ​​संचालक आणि अध्यक्ष एल. सबारत्नम (L Sabaratnam) यांचे दीर्घ आजाराने रविवारी चेन्नई येथे निधन झाले. बंगळुरुविरुद्ध (CSK vs RSB) विजय मिळवल्यानंतर चेन्नईसाठी आनंदाचा दिवस होता मात्र एल सबारत्नम यांच्या निधनानंतर चेन्नईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सबारत्नम बराच काळ चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक होते. याआधी ते चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे संचालक देखील होते. इतकेच नव्हे तर ते इंडिया सिमेंट्सचे सल्लागार आणि कोरोमंडल शुगर्सचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते.

संबंधित बातम्या:

IPL 2021 : रिषभ पंतमुळे आऊट झाला, पृथ्वी शॉने रागात बाऊन्ड्री लाईनवरुन हेल्मेट फेकून दिलं!, पाहा व्हिडीओ…

IPL 2021 : ‘जिसे डरते थे, वहीं बात हो गयी’, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला ‘डबल धक्का’!

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, ‘सर जाडेजा इज ग्रेट…!’

(Adam Zampa Kane Richardson join Andrew Tye in withdrawing from IPL 2021)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.