Aus vs Ind 3rd Test | सिडनीच्या मैदानात येणाऱ्यांना मास्क बंधनकारक, प्रेक्षकांवर तगड्या दंडाची तरतूद

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना 7-11 जानेवारीदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.

Aus vs Ind 3rd Test | सिडनीच्या मैदानात येणाऱ्यांना मास्क बंधनकारक, प्रेक्षकांवर तगड्या दंडाची तरतूद
तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 4:02 PM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs IND 3rd Test) यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून खेळण्यात येणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) खेळला जाणार आहे. या सामन्याआधी स्थानिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यात येणाऱ्या प्रत्येक क्रिकेट चाहत्याला मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास तब्बल काही हजारो रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. (aus vs ind 3rd test masks are mandatory for fans to the Sydney cricket grounds)

सिडनीमध्ये सामना पाहण्यास येणाऱ्या प्रत्येक क्रिकेट चाहत्याला मास्क बंधनकारक असणार आहे. केवळ खाण्याच्या वेळेस मास्क काढता येणार आहे, अशी घोषणा न्यू साऊथ वेल्सचे आरोग्य मंत्री ब्राड हर्जाड यांनी केली आहे. मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळण्यात आला होता. हा सामना पाहायला आलेल्या एका क्रिकेट चाहत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा चाहता सामन्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खबरदारी म्हणून मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.

नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मास्क न घालणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नियमाचं उल्लंघन करणाऱ्याकडून तब्बल 155 डॉलर इतके वसूल केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त या स्टेडियमच्या आसपासच्या भागात विनामास्क फिरणाऱ्यांवर तब्बल 56 हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे.

सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सिडनीमध्ये तिसऱ्या कसोटीच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने स्थानिक सरकारच्या मदतीद्वारे येथे सिडनीतच आयोजन केलं.

25 टक्के क्रिकेट चाहत्यांनाच परवानगी

कोरोनामुळे खबरदारी म्हणून या स्टेडिमयवर मोजक्याच क्रिकेट चाहत्यांना उपस्थित राहता येणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममधून सामना पाहता येणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हिटमॅन रोहित शर्माने कमबॅक केलं आहे. तर फास्टर बोलर नवदीप सैनीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. या सामन्याला 7 जानेवारीला सकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test | सिडनी कसोटीत टीम इंडियाची मदार दोन मुंबईकरांवर

Aus vs Ind 3rd Test | रोहित शर्माचं पुनरागमन, नवदीप सैनीला पदार्पणाची संधी, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

(aus vs ind 3rd test masks are mandatory for fans to the Sydney cricket grounds)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.