Aus vs Ind, 3rd Test | जाडेजा मैदानात न उतरल्याचा फायदा, कांगारुंचा लाजिरवाणा पराभव टळला

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे.

Aus vs Ind, 3rd Test | जाडेजा मैदानात न उतरल्याचा फायदा, कांगारुंचा लाजिरवाणा पराभव टळला
रवींद्र जाडेजाची दुखापत कांगारुंच्या पथ्यावर
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 2:33 PM

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना (Aus vs Ind, 3rd Test) ड्रॉ झाला आहे. कांगारुंनी टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला पाचव्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 334 धावा करता आल्या. दरम्यान टीम इंडियाला हा सामना जिंकण्याचीही संधी होती. मात्र निर्णायक क्षणी कांगारुंच्या गोलंदाजांनी सेट झालेल्या (Rishabh pant) रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) बाद केलं. परिणामी टीम इंडियाने सामना वाचवण्याच्या दृष्टीने ड्रॉच्या उद्देशाने खेळ केला. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) पहिल्या डावात फलंदाजी करताना दुखापत झाली. ही दुखापत टीम इंडियाला चांगलीच महागात पडली. तर कांगांरुंना जाडेजाच्या दुखापतीचा फायदा झाला, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. (aus vs ind 3rd test match at scg australia benefit from ravindra jadeja injury)

जाडेजाला पहिल्या डावात बॅटिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला नाबाद 28 धावांवर मैदानाबाहेर परतला. जाडेजाला चांगली सुरुवात मिळाली होती. जाडेजा फार विश्वासाने खेळत होता. मात्र दुखापतीमुळे त्याला बाहेर जावे लागले. जाडेजाला ही दुखापत झाली नसती तर जाडेजाने आणखी काही धावा केल्या असत्या. परिणामी कांगारुंना दुसऱ्या डावात आणखी कमी धावांची आघाडी मिळाली असती.

दुसऱ्या डावात गोलंदाजी नाही

जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचं निदान झालं. जाडेजाच्या अंगठ्याचं स्कॅन करण्यात आलं. स्कॅन रिपोर्टनुसार जाडेजाचा अंगठा फ्रॅक्चर झाला. परिणामी जाडेजाला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नाही. जाडेजा आपली ओव्हर फार वेगाने पूर्ण करतो. जाडेजा दीड मिनिटांमध्ये आपली ओव्हर संपवतो. त्यामुळे जाडेजाच्या फिरकीत किमान 2 फलंदाज अडकतात. मात्र जाडेजा नसल्याने कांगारुंना सहजपणे फंलदाजी करता आली. यामुळे कांगारुंनी दुसऱ्या डावात सहजपणे 338 धावा केल्या.

….तर भारत जिंकला असता?

पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला. भारताला विजयासाठी 309 धावांची आवश्यकता होती. पाचव्या दिवशी रहाणे झटपट बाद झाला. त्यानंतर पंत आणि पुजाराने 148 धावांची भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या. मात्र पंत आणि पुजारा ही सेट जोडी बाद झाली. त्यामुळे अश्विन आणि हनुमा विहारीला ड्रॉच्या उद्देशाने खेळ करावा लागला.

जाडेजा फीट असता तर तो मैदानाच खेळायला आला असता. जाडेजा इंजेक्शन घेऊन खेळायला येणार असंही म्हटलं जात होतं. मात्र ही दुखापत जाडेजा आणि टीम इंडियाला चांगलीच महागात पडली. जाडेज जर फीट असता, तर सामन्याचा निकाल नक्कीच टीम इंडियाच्या बाजूने असता, अशा प्रतिक्रिया टीम इंडियाच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहेत. मात्र दुखापतीअभावी जाडेजा खेळू शकला नाही. याचाच फायदा ऑस्ट्रेलियाला झाल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Ravindra Jadeja | टीम इंडियासाठी मोठा धक्का, जाडेजा इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींना मुकणार

‘तू तो देवमाणूस निकला रे’; दुखापतीनंतरही आक्रमक 97 फटकावणाऱ्या ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव

(aus vs ind 3rd test match at scg australia benefit from ravindra jadeja injury)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.