AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया चौथी कसोटी खेळणार की नाही? ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड म्हणतं…

कोरोनाच्या कडक नियमांमुळे टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्ये चौथी कसोटी खेळण्यास नकार दिल्याचं वृत्त होतं.

टीम इंडिया चौथी कसोटी खेळणार की नाही? ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड म्हणतं...
ब्रिस्बेन टेेस्ट बद्दल ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
| Updated on: Jan 04, 2021 | 3:47 PM
Share

ब्रिस्बेन : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Team India vs Australia)  यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) चौथा आणि शेवटचा सामना ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) खेळण्यात येणार आहे. ब्रिस्बेनमध्ये कोरोनाचे नियम अत्यंत कडक आहेत. या कडक नियमांमुळे टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्ये चौथी कसोटी खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त होते. यावरुन चांगलाच वादही निर्माण झाला. नियमांनुसार खेळायचं असेल तरच या, असा धमकीवजा इशारा क्वीसलॅंडच्या शेडो आरोग्य मंत्री रोस बेट्स यांनी दिला. या सर्व प्रकरणावरुन ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आपली भूमिका मांडली आहे. (aus vs ind australia cricket board big statement on Brisbane Test )

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं म्हणणं काय ?

टीम इंडिया ब्रिस्बेनमध्येस खेळण्यास तयार नसल्याचं वृत्ताचं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने खंडन केलं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे निक हॅकले (Nick Hockley) यांनी हे सर्व वृत्त फेटाळून लावले आहेत. तसेच टीम इंडिया अपेक्षित सहकार्य करत आहे. दोन्ही संघ नियोजित वेळापत्रकानुसार चौथा सामना खेळण्यास तयार आहेत, अशी प्रतिक्रिया निक हॅकले यांनी दिली.

नक्की प्रकरण काय?

ठरलेल्या वेळापत्रकानुसार 15 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. ब्रिस्बेनमध्ये कोरोनाचे नियम अत्यंत कडक आहेत. या कडक नियमांमुळे टीम इंडियाच नकार आहे. टीम इंडियाचे खेळाडू आधीच आयपीएलनिमित्त दुबईत क्वारंटाईन राहिले. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीलाही क्वारंटाईन होते. आम्ही आता पुन्हा क्वारंटाईन राहणार नाहीत. क्वारंटाईन कालावधीनंतर आम्हाला ऑस्ट्रेलियात सामान्य नागरिकांनुसार फिरण्याची मुभा मिळेल, असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. आता पुन्हा आम्हाला क्वारंटाईन राहायचं नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्राने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या हवाल्याने दिली.

या सर्व प्रकरणावरुन गेल्या 2 दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र आता ऑस्ट्रेलिया बोर्डाने स्पष्टीकरण दिल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाले आहे. मात्र बीसीसीआयकडून अजूनही कोणती प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दोन्ही संघ सिडनीला रवाना

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना 7 जानेवारीला सिडनीमध्ये खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सिडनीमध्ये दाखल झाले आहेत. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली.

मालिका बरोबरीत

बॉर्डर गावसकर मालिकेतील आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. यामुळे तिसरा सामना अटीतटीचा होणार आहे.

संबंधित बातम्या :

Brisbane Test | “नियमांनुसार खेळायचं असेल तरच या”, ब्रिस्बेनमध्ये चौथी कसोटीस नकार देणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्याचा इशारा

(aus vs ind australia cricket board big statement on Brisbane Test )

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.