Tim Paine | भारताविरुद्ध लाजिरवाणा पराभव, आता ऑस्ट्रेलियाच्या टीम पेनचं कर्णधारपदच धोक्यात!

टीम पेनला (Tim Paine) कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

Tim Paine | भारताविरुद्ध लाजिरवाणा पराभव, आता ऑस्ट्रेलियाच्या टीम पेनचं कर्णधारपदच धोक्यात!
यामध्ये सर्वात पहिला नाव येत ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार यष्टीरक्षक टिम पेन (Tim Paine). टीम संघाला अंतिम सामन्यात घेऊन जाण्यात अयशस्वी झाला असला तरी त्याने संपूर्ण स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. टीमने 14 सामन्यांतील 28 डावांत सर्वाधिक 65 बळी मिळवले. यात 63 झेलआणि स्टंपिंगचा समावेश होतो. एका डावात 5 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

कॅनबेरा : टीम इंडियाने कसोटी मालिकेत (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमित पराभव केला. टीम इंडियाने ब्रिस्बेनमधील गाबामध्ये (The Gabba) चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. याविजयासह टीम इंडियाने कसोटी मालिका जिंकली. गाबा ऑस्ट्रेलियाचा गड मानला जातो. मात्र टीम इंडियाने कांगारुंचा 32 वर्षानंतर गाबामध्ये पराभव केला. या कसोटी मालिकेतील पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनवर (Australia Test Captain Tim Paine) सडकून टीका करण्यात येत आहे. त्याचं कर्णधारपद धोक्यात आलं आहे. त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेट (Cricket Australia) बोर्डाने त्याची पाठराखण केली आहे. (australia selector trevor hohns support to test captain tim paine)

“पेनने टीम इंडियाविरोधात सातव्या क्रमांकावर शानदार फलंदाजी केली. तो एक फलंदाज, विकेटकीपर आणि फलंदाज अशा तिन्ही भूमिका सार्थपणे पार पाडतोय. भविष्यात तो आणखी चांगली कामगिरी करेल”, असं म्हणत ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे सदस्य ट्रेवर हॉंस यांनी पेनची पाठराखण केली आहे.

2018 मध्ये कर्णधारपदी निवड

पेनची 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. 2018 मध्ये आफ्रिकेविरोधातील तिसऱ्या कसोटीत डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ यांच्यावर चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी निलंबनात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे स्टीव्हच्या जागी पेनला कर्णधार करण्यात आले होते.

“पेनने ऑस्ट्रेलियासाठी कठीण काळात उत्तमरित्या नेतृत्व केलं आहे. तसेच चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यावर कर्णधारपदावरून टीका करणं अयोग्य आहे. टीम मॅनेजमेंट आणि प्रशासन त्याच्या पाठीशी आहोत”, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे कार्यकारी प्रंबधक बेन ओलिवर यांनी दिली.

दरम्यान ऑस्ट्रेलियाचे 2 स्वतंत्र संघ टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धातील टेस्ट सीरिजसाठी जाणार आहेत. या कसोटी मालिकेतील नेतृत्वाची जबाबदारीही पेनलाच दिली आहे.

आफ्रिकेविरुद्धातील कसोटी मालिकेसाठी टीम ऑस्ट्रेलिया : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स, सीन एबॉट, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, मोइसेस हेनरिक्स, नॅथन लायन, माइकल नीसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्क स्टीकटी, मिचेल स्वैपसन आणि डेव्हिड वॉर्नर.

संबंधित बातम्या :

Australia Tour South Africa 2021 | भारताविरुद्धच्या कामगिरीचा फटका, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडला बाहेरचा रस्ता

IPL 2021 Auction Date | IPL 2021 च्या लिलावाची जय्यत तयारी, तारीख आणि ठिकाण ठरलं

सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

(australia selector trevor hohns support to test captain tim paine)

Published On - 3:28 pm, Wed, 27 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI