Mohammad Shami | टीम इंडियाला मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेला शमी, आता इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला मुकणार?

मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती.

Mohammad Shami | टीम इंडियाला मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेला शमी, आता इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला मुकणार?

मेलबर्न : टीम इंडियाचा मु्ख्य गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammad Shami) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेला मुकावं लागलं आहे. शमीला पहिल्या सामन्यात दुसऱ्या डावातील फलंदाजीदरम्यान उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे शमीला कसोटी मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. दरम्यान आता शमीच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट आली आहे. (Australia vs India Mohammed Shami will be out of cricket for 6 weeks due to injury)

डॉक्टरांनी शमीला दुखापतीमुळे किमान 6 आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे शमीला नववर्षात इंग्लडंविरोधातील मालिकेला मुकावं लागू शकतं. त्यामुळे टीम इंडियासाठी ही वाईट बातमी आहे. नववर्षात अर्थात फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडियाविरोधात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दुखापतीमुळे शमीचं इंग्लंडविरोधात खेळणारा की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहेत. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारी 2021 ला पहिली कसोटी खेळण्यात येणार आहे. शमी 22 जानेवारीला ऑस्ट्रेलियातून भारतात परतणार आहे. शमीला भारतात परतल्यानंतर नियमांनुसार काही दिवस क्वारंटाईन रहावं लागणार आहे.

शमीला ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दुखापत झाली होती. पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू शमीच्या उजव्या हाताच्या मनगटाला लागला होता. यामुळे शमीला रिटायर्ड हर्ट घोषित करण्यात आलं. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला बॅटही उचलण्यास त्रास जाणवत होता.

यामुळे शमी दुसऱ्या डावात गोलंदाजीही करण्यास आला नाही. या सामन्यानंतर शमीची चाचणी करण्यात आली. यामध्ये त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं. त्यामुळे शमीला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली.

शमी जानेवारीपर्यंत दुखापतीतून सावरेल?

सूत्रांच्या माहितीनुसार, शमी 6 आठवड्याच्या विश्रांतीनंतर दुखापतीतून सावरेल. शमी जानेवारीपर्यंत पूर्पपणे फीट होईल. शमी ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेतून बाहेर पडल्याने टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. त्यामुळे शमीच्या जागेवर उर्वरित 3 कसोटींसाठी मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळण्यात येणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे.

संबंधित बातम्या :

England Tour India | इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, ‘या’ 3 स्टेडियमध्ये खेळण्यात येणार सामने

Australia vs India | टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे मुख्य गोलंदाज मालिकेबाहेर

(Australia vs India Mohammed Shami will be out of cricket for 6 weeks due to injury)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI