राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून 'महाराष्ट्र केसरी' बाला रफीक शेखची माघार

मुंबई : हिंदकेसरी स्पर्धेचा दर्जा असलेली पहिली मातीवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ बाला रफीक शेख ने माघार घेतली आहे. ‘हिंदकेसरी’ हा किताब नसल्याने देशाभरातील मल्लांनी या स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. 29 ते 30 डिसेंबर दरम्यान पुण्यातील सह्याद्री क्रीडा संकुलात ही कुस्ती स्पर्धा भरवली जाणार आहे. नेमका वाद काय आहे? भारतीय कुस्ती महासंघाने …

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून 'महाराष्ट्र केसरी' बाला रफीक शेखची माघार

मुंबई : हिंदकेसरी स्पर्धेचा दर्जा असलेली पहिली मातीवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ बाला रफीक शेख ने माघार घेतली आहे. ‘हिंदकेसरी’ हा किताब नसल्याने देशाभरातील मल्लांनी या स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. 29 ते 30 डिसेंबर दरम्यान पुण्यातील सह्याद्री क्रीडा संकुलात ही कुस्ती स्पर्धा भरवली जाणार आहे.

नेमका वाद काय आहे?

भारतीय कुस्ती महासंघाने पुण्यात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भरवली आहे. हिंदकेसरीचा दर्जा या स्पर्धेला आहे. मात्र, भारतीय शैली कुस्ती संघटनेने न्यायालयात धाव घेतल्याने ही स्पर्धा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. ‘हिंदकेसरी’ स्पर्धा नेमकी कुणाची, हे वादाचं मुख्य कारण आहे. न्यायालयाच्या निकालानंतरच ‘हिंदकेसरी’ स्पर्धा कुणाची, हे ठरणार आहे.

दुसरीकडे, भारतीय शैली कुस्ती संघटनेने फेबुवारीत कोल्हापुरात ‘हिंदकेसरी’ स्पर्धेचं आयोजन केले असून, या स्पर्धेत यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ बाला रफीक शेख खेळण्यास उत्सुक आहे. मात्र, या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंवर भारतीय कुस्ती महासंघ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यास बंदी घालणार असल्याने खेळाडूंमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

बाला रफिक शेख ‘महाराष्ट्र केसरी’  

जालना इथं रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2018 ची फायनल लढत पार पडली. यामध्ये करमाळ्याच्या बाला रफिक शेखने पुण्याच्या अभिजीत कटकेवर 11-3 गुणांनी मात करत, महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.

कोण आहे बाला रफिक शेख?

बाला रफिक शेख हा मूळचा सोलापूरचा आहे. तो कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीचा पैलवान आहे. त्याच्या घरात 10 वर्षांपासून कुस्तीची परंपरा चालत आली आहे. बाला रफिक शेखचे वजन-120 किलो, तर उंची-6 फूट आहे. बाला रफिक शेख वयाच्या 13 व्या वर्षी कुस्तीसाठी घर सोडून कोल्हापुरात दाखल झाला. हिंदकेसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांचा तो शिष्य आहे. त्याने डबल महाराष्ट्र केसरी ठरलेल्या चंद्रहार पाटलांकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत. तो सध्या पुण्याच्या हनुमान आखाड्यात सराव करतो.

बाला रफिकच्या घरची परिस्थिती बिकट. पैलवानाला लागणारा दोन वेळचा हवा तसा खुराकही त्याला व्यवस्थित मिळत नव्हता. तरीही आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे सिद्ध करुन दाखवले की, परिस्थिती कशीही असेल, तरीही जर आपण ठरवलं तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *