AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वृत्तापत्राकडून सावत्र वडिलांविषयी खुलासा, वाचून बेन स्टोक्सला धक्का

इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्ट्रोक्सला (England all rounder Ben Stokes) आपल्या मागील आयुष्याविषयी (Ben stokes family tragedy)  वाचल्यानंतर चांगलाच झटका बसला आहे.

वृत्तापत्राकडून सावत्र वडिलांविषयी खुलासा, वाचून बेन स्टोक्सला धक्का
| Updated on: Sep 17, 2019 | 9:52 PM
Share

लंडन : इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्ट्रोक्सला (England all rounder Ben Stokes) आपल्या मागील आयुष्याविषयी (Ben stokes family tragedy)  वाचल्यानंतर चांगलाच झटका बसला आहे. जवळपास 30 वर्षांपूर्वी स्ट्रोक्सच्या वडिलांनी त्याच्या सावत्र बहीण आणि भावाची हत्या केली होती. असे वृत्त एका ब्रिटीश वृत्तपत्राने (British newspaper) दिले आहे. हे वृत्त वाचल्यानंतर स्ट्रोक्सच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. स्ट्रोक्सने (England all rounder Ben Stokes) या वृत्तपत्राबाबत एक भावनिक ट्विट पोस्ट केली असून या वृत्तपत्राचे वागणे अयोग्य असल्याचे म्हटलं आहे.

तीन दशकांपूर्वी झालेल्या त्या भयानक आणि दृदैवी घटनेला विसरण्यासाठी मला आणि माझ्या परिवाराला अनेक वर्ष लागले. मात्र या वृत्तपत्राने रिपोर्टरलाम माझ्या (Ben stokes family tragedy) घरी न्यूझीलंडला पाठवून हे सर्व पुन्हा उकरुन काढलं आहे, असे बेन स्ट्रोक्सने (England all rounder Ben Stokes) लिहीले आहे.

त्याशिवाय पुढे स्ट्रोक्सने (Ben stokes family tragedy) लिहिले, माझ्या नावाचा वापर करत माझे खाजगी आयुष्य तसेच माझ्या आई-वडीलांच्या खाजगी आयुष्यावर हल्ला चढवला आहे. हे सर्व फार चुकीचे आहे. माझे आई-वडील, पत्नी आणि मुले माझ्या कुटुंबाच्या खाजगी आयुष्याविषयी बोलण्याचा काहीही अधिकार नाही.”

वृत्तापत्राने दिलेल्या रिपोर्टमध्ये नेमकं काय? 

वृत्तपत्राने हा रिपोर्ट 49 वर्षीय जैकी डनच्या हवाल्याने लिहिला आहे. बेन स्टोक्सची (Ben stokes family tragedy) आई डेब स्ट्रोक्स यांचा पहिला नवरा रिचर्ड डन यांच्यात वाद सुरु होते. यामुळे एप्रिल 1988 मध्ये स्ट्रोक्सच्या जन्मापूर्वी 8 वर्षीय सावत्र बहिण ट्रेसी आणि 4 वर्षीय सावत्र भाऊ अँड्र्यूची निर्घुणपणे हत्या केली होती. ही हत्या रिचर्ड डन यांनी केली होती. याच वेळी डेब स्ट्रोक्स गर्भवती होत्या.

जैकी डन ही रिचर्ड डन यांची मुलगी आहे. जैकी डन यांनी त्या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, “मी तेव्हा फक्त 18 वर्षांची होती. माझ्या वडिलांनी त्या दोन मुलांची हत्या केली होती हे ऐकून माझा विश्वासच बसत नव्हता. मला त्यांचा अजून एक मुलगा आहे याची कोणतीही माहिती नव्हती. त्यांचा अजून एक मुलगा असून तो इंग्लंडचा स्टार क्रिकेटर आहे.”

यानंतर डेब स्ट्रोक्सने दुसरे लग्न केले. गेराड स्ट्रोक्स असे बेन स्ट्रोक्सच्या (Ben stokes family tragedy) वडिलांचे नाव. बेन स्ट्रोक्सचे वडील रग्बीचे मोठे खेळाडू होते.

त्याच्या सावत्र भावंडांना मारण्यामागे रिचर्ड डन यांचा संशयी स्वभाव कारणीभूत होता. 39 वर्षी बेरोजगार असलेल्या रिचर्ड डन यांना जेव्हा डेब आणि गेराड स्ट्रोक्स यांच्या मैत्रीविषयी समजले. त्यानंतर डन यांनी हे कृत्य केले. यानंतर बेन स्ट्रोक्सचा जन्म झाल्यानंतर 12 वर्षांनी त्याचे आई-वडील इंग्लंडला स्थायिक झाले.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...