कोहलीने गांगुलीचा विक्रम मोडला, आता धोनी टार्गेटवर

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा 50 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार पद सांभाळणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे (Virat Kohli Captain 50 test matches). गुरुवारी (10 ऑक्टोबर) पुण्याच्या मैदानावर टॉससाठी पोहोचताच विराट कोहलीने हा नवा रेकॉर्ड केला

कोहलीने गांगुलीचा विक्रम मोडला, आता धोनी टार्गेटवर

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा 50 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार पद सांभाळणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे (Virat Kohli Captain 50 test matches). गुरुवारी (10 ऑक्टोबर) पुण्याच्या मैदानावर टॉससाठी पोहोचताच विराट कोहलीने हा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला (Virat Kohli New Record). कोहलीपूर्वी फक्त माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीनेच 50 पेक्षा जास्त कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार पद सांभाळलं आहे.

तिसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने 49 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार पद सांभाळलं होतं (Virat Kohli break Sourav Ganguly’s record). त्यामुळे तो या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, 2008 ते 2014 पर्यंत कर्णधार असलेल्या एमएस धोनीने 60 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं कर्णधार पद सांभाळलं (MS Dhoni).

एमएस धोनी, गांगुली आणि कोहली यांच्या व्यतिरिक्त माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांनी भारतासाठी 47 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार पद सांभाळलं. मंसूर अली खान पटौदी यांनीही 40 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं कर्णधार पद सांभाळलं.

कर्णधार पदाचं अर्धशतक गाठलेला विराट कोहली हा जगातील 14 वां कर्णधार आहे. कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा संघाचं कर्णधार पद सांभाळलं. या मालिकेत एमएस धोनीने कसोटी सामन्यांमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी पूर्णपणे विराट कोहलीच्या खांद्यावर आली.

टीम इंडिया तीन वर्षांपासून आयसीसी रँकिंगमध्ये नंबर-1

कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघ अतिशय चांगलं प्रदर्शन करत आहे. टीम इंडिया गेल्या तीन वर्षांपासून नंबर-1 आहे. कोहलीच्या नेतृत्त्वात भरताने आजपर्यंत जे 49 सामने खेळले आहेत, त्यापैकी 29 सामने जिंकले आहेत, तर 10 सामने ड्रॉ झाले आहेत. कोहलीच्या नेतृत्त्वात भारत 2016 मध्ये आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आणि तीन वर्षांपासून भारतच नंबर-1 आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI