IND vs ENG: चेतेश्वर पुजाराचे नाबाद अर्धशतक, भारताकडे एकूण 250 धावांची लिड

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने लंचनंतरच्या सत्रात शानदार गोलंदाजी करत जॉनी बेअरस्टोच्या सुरेख शतकाचा प्रभाव कमी केला. त्यामुळे रविवारी तिसऱ्या दिवशी इंग्लंडला 284 धावांत गुंडाळून भारताने पहिल्या डावात 132 धावांची मोठी लिड घेतली.

IND vs ENG: चेतेश्वर पुजाराचे नाबाद अर्धशतक, भारताकडे एकूण 250 धावांची लिड
चेतेश्वर पुजाराचे नाबाद अर्धशतक, भारताकडे एकूण 250 धावांची लिडImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 1:59 AM

बर्मिंघम : अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)ने तिसऱ्या दिवशी आपले अर्धशतक (Half Century) पूर्ण केल्याने भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत दुसऱ्या डावात 3 बाद 125 रन्स (Runs) केले. यासह भारताकडे एकूण 257 रन्सची लिड आहे. स्टंप्सच्या वेळी पुजारा 50 तर उपकर्णधार ऋषभ पंतने 30 धावा केल्या. तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांत आटोपला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने लंचनंतरच्या सत्रात शानदार गोलंदाजी करत जॉनी बेअरस्टोच्या सुरेख शतकाचा प्रभाव कमी केला. त्यामुळे रविवारी तिसऱ्या दिवशी इंग्लंडला 284 धावांत गुंडाळून भारताने पहिल्या डावात 132 धावांची मोठी लिड घेतली.

दिवसाचे सलामीचे सत्र पूर्णपणे बेअरस्टोच्या नावे होते

त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 37 धावा केल्या, टी-ब्रेकपर्यंत शुभमन गिलची (4) विकेट जाऊन संघाची एकूण आघाडी 169 वर नेली. दिवसाचे सलामीचे सत्र पूर्णपणे बेअरस्टो (140 चेंडूत 106 धावा)च्या नावावर होते. दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान संघर्ष करणाऱ्या बेअरस्टोला तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या 20 मिनिटांच्या खेळादरम्यान अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने बेअरस्टोच्या फलंदाजीवर काही टीका केली आणि इंग्लंडच्या फलंदाजाने आपली खेळीत बदल केला.

मिड ऑफ आणि ओव्हर मिड विकेटवरून जॉनी बेअरस्टोने काही चांगले चौकार ठोकले. त्याने मोहम्मद सिराज आणि शार्दुलविरुद्धही षटकार ठोकले. मात्र, दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सिराजने (66 धावांत 4 बळी) भारतीय संघात पुनरागमन केले. त्याला मोहम्मद शमीने (78 धावांत 2 बळी) निर्माण केलेल्या दबावाचा फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

बेअरस्टोचे कसोटी कारकिर्दीतील 11 वे शतक

बेअरस्टोने शार्दुल ठाकूरविरुद्ध (48 धावांत 1 बळी) चौकार मारून कसोटी कारकिर्दीतील 11 वे शतक पूर्ण केले. यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने (68 धावांत 3 बळी) जोरदार गोलंदाजी करत त्याच्यावर दबाव आणला. त्यामुळे 14 चौकार आणि 2 षटकार मारणाऱ्या बेअरस्टोला पुढच्या 20 चेंडूत केवळ 6 धावा करता आल्या. दबाव कमी करण्यासाठी त्याने मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात कोहलीला कॉच दिला. बेअरस्टो आणि सॅम बिलिंग्ज (36) यांची 92 धावांची भागीदारी तोडल्यानंतर सिराजने 43 रन्सच्या आत इंग्लंडच्या उर्वरित तीन विकेट घेतल्या.

स्टोक्सला दोन जीवदान

दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात बेअरस्टोने कर्णधार बेन स्टोक्स (25) सोबत सहाव्या विकेटसाठी 66 रन्सची भागीदारी केली. कर्णधार जसप्रीत बुमराहने शार्दुलच्या चेंडूवर डाइव्ह टाकून शानदार झेल घेतला आणि स्टोक्सचा 36 चेंडूंचा डाव संपवला. या विकेटपूर्वी इंग्लंडने डावाच्या 33 ते 36 व्या षटकात सात चौकार मारले आणि स्टोक्सला दोन जीवदान मिळाले. शार्दुलला इंग्लंडच्या कर्णधाराचा गगनचुंबी शॉट झेलण्यास अपयश आले आणि त्यानंतर बुमराहने त्याच्या चेंडूवर सोपा झेल सोडला. यानंतर मात्र बुमराहने शानदार झेल घेत स्टोक्सला मोठा खेळण्याची संधी दिली नाही. (Cheteshwar Pujaras unbeaten half century gave India a 250 run lead)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.