CWG 2022 Live Updates: भारताकडून आणखी एका पदकाची कमाई! सौरव घोषालने स्क्वाश या क्रीडा प्रकारात पटकावले ब्रॉन्ज मेडल

| Updated on: Aug 04, 2022 | 2:53 PM

कॉमनवेल्थ गेम्स लाइव : कॉमनवेल्थ गेम्सचा आज सहावा दिवस आहे. भारतीय संघाला आजही पदकं जिंकण्याची मोठी संधी आहे.

CWG 2022 Live Updates: भारताकडून आणखी एका पदकाची कमाई! सौरव घोषालने स्क्वाश या क्रीडा प्रकारात पटकावले  ब्रॉन्ज मेडल

कॉमनवेल्थ गेम्स (CWG) लेटेस्ट न्यूज़: कॉमनवेल्थ गेम्सचा आज सहावा दिवस आहे. आजही भारताकडे मेडल जिंकण्याच्या अनेक संधी आहेत. वेटलिफ्टिंग आणि अन्य खेळांमध्ये भारताकडे पदक विजेती कामगिरी करण्याची संधी आहे. काही खेळांमध्ये भारतीय संध पदक जिंकण्याच्या जवळ जाताना दिसेल. क्रिकेटबद्दल बोलायच झाल्यास, आज बारबाडोसच्या टीमला हरवून भारतीय महिला क्रिकेट संघ सेमीफायनल मध्य पोहोचण्याचा प्रयत्न करेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Aug 2022 11:25 PM (IST)

    भारताकडून आणखी एका पदकाची कमाई! सौरव घोषालने स्क्वाश या क्रीडा प्रकारात पटकावले ब्रॉन्ज मेडल

    भारताकडून आणखी एका पदकाची कमाई! सौरव घोषालने स्क्वाश या क्रीडा प्रकारात पटकावले ब्रॉन्ज मेडल

  • 03 Aug 2022 07:07 PM (IST)

    Hockey: IND vs CAN: पूल बी सामन्यात भारताने कॅनडाचा 8-0 असा पराभव केला

    भारतीय पुरुष हॉकी टीम ग्रुप राउंड मध्ये आज कॅनडाचा सामना करत आहे. पहिल्या क्वार्टर मध्ये भारताकडे 2-0 अशी आघाडी आहे. भारताकडून पहिल्याच पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत सिंहने शानदार ड्रॅग फ्लिक करुन गोल केला. त्यानंतर रोहिदासने दुसरा गोल डागला.

  • 03 Aug 2022 06:38 PM (IST)

    Boxing: हुसमुद्दीनचं मेडल निश्चित

    बॉक्सिंग मध्ये भारताचं आणखी एक मेडल निश्चित झालं आहे. मोहम्मद हुसमुद्दीनने नाम्बियाच्या ट्राय अगेनवर 4-1 असा विजय मिळवून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. त्याने एक मेडल निश्चित केलं आहे.

  • 03 Aug 2022 06:03 PM (IST)

    हॉकी: भारताने कॅनडाला हरवलं

    भारतीय महिला टीमने बुधवारी हॉकी मध्ये कमाल केली. ग्रुप ए पूल मॅच मध्ये भारताने कॅनडाला रोमांचक सामन्यात 3-2 ने हरवलं.

  • 03 Aug 2022 06:01 PM (IST)

    Boxing: नीतू घंघासने मेडल निश्चित केलं

    भारतीय बॉक्सर नीतू घंघासने 48 किलो वजनी गटात निकलोस क्लाइडला हरवून सेमीफायनल मध्ये स्थान निश्चित केलं आहे. नीतूने बॉक्सिंग मध्ये भारतासाठी मेडल निश्चित केलं आहे.

  • 03 Aug 2022 05:09 PM (IST)

    Judo: तुलिका मानचं मेडल पक्क

    भारताच्या तुलिका मानने महिलांच्या 78 प्लस वजनी गटात फायनल मध्ये प्रवेश केला आहे. तिने सेमीफायनल मध्ये न्यूझीलंडच्या सिंडी एंड्रयूचा पराभव केला. तिने देशासाठी ज्युडो मध्ये तिसरं मेडल निश्चित केलं आहे.

  • 03 Aug 2022 05:07 PM (IST)

    Squash: जोश्ना-हरिंदर राऊंड ऑफ 16 मध्ये पोहोचले

    जोश्ना चिनाप्पा आणि हरिंदर पाल सिंहच्या जोडीने मिक्स्ड डबल्समध्ये श्रीलंके विरुद्ध 8-11, 11-4,11-3 असा विजय मिळवला.

  • 03 Aug 2022 04:41 PM (IST)

    Hockey: IND vs CAN: भारत हाफ टाइम मध्ये 2-1 ने पुढे

    हॉकी सामन्यात पहिल्या हाफ मध्ये भारताने 2-1अशी आघाडी मिळवली आहे. हा लीड जास्तीत जास्त वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारतासाठी पहिला गोल सलीमाने आणि दुसरा लालरेमसियामीच्या पासवर नवनीतने केला.

  • 03 Aug 2022 04:27 PM (IST)

    Judo: तुलिका मान सेमीफायनल मध्ये

    ज्युडो मध्ये भारताच्या तुलिका मानने 78 प्लस वजनी गटात सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. तिने मॉरिशेसच्या ट्रेसी डरहोनचा पराभव केला.

  • 03 Aug 2022 04:09 PM (IST)

    वेटलिफ्टिंग मध्ये आणखी एक मेडल

    वेटलिफ्टिंग मध्ये आणखी एक मेडल मिळालं आहे. भारताच्या खात्यात एकूण 14 पदकं झाली आहेत. वेटलिफ्टर लवप्रीत सिंहने ब्राँझ मेडल मिळवलं. त्याने एकूण 355 किलो वजन उचललं.

  • 03 Aug 2022 04:02 PM (IST)

    Hockey: IND vs CAN: भारत 1-0 ने पुढे

    महिलांच्या पूल मध्ये भारत आणि कॅनडा मध्ये सामना सुरु झाला आहे. भारताला सुरुवातीलाच पेनल्टी कॉर्नर मिळालाय. वंदनाने त्या कॉर्नरच गोलमध्ये रुपांतर केलं.

  • 03 Aug 2022 04:01 PM (IST)

    Para TT: भाविना पटेलची विजयी सुरुवात

    भारताची पॅरा टेबल टेनिस खिळाडू भाविना पटेलने विजयाने सुरुवात केली आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या डॅनिया डी टोरोला 3-1 ने हरवलं. टोक्यो ओलिंपिक चॅम्पियनकडून इथे गोल्ड मेडलची अपेक्षा आहे.

  • 03 Aug 2022 03:52 PM (IST)

    Weightlifting: लवप्रीत सिंहची स्नॅच पाठोपाठ क्लीन अँड जर्क मध्येही चांगली सुरुवात

    भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंहने क्लीन अँड जर्क मध्ये चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या प्रयत्नात त्याने 185 किलो वजन उचललं. दुसऱ्याप्रयत्नात त्याने 189 किलो वजन यशस्वीरित्या उचललं.

  • 03 Aug 2022 03:34 PM (IST)

    ज्युडो: दीपक देस्वालचा पराभव

    ज्युडो: 100 किलो वजनी गटात भारताच्या दीपक देस्वालचा क्वार्टर फायनल मध्ये इंग्लंडच्या हॅरी लव्हेलकडून पराभव झाला.

  • 03 Aug 2022 03:06 PM (IST)

    वेटलिफ्टिंग: लवप्रीतने निर्माण केली गोल्डची अपेक्षा

    लवप्रीतने वेटलिफ्टिंग मध्ये आणखी एका गोल्ड मेडलची अपेक्षा निर्माण केली आहे. स्नॅचच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने 163 किलो वजन उचललं.

  • 03 Aug 2022 02:59 PM (IST)

    वेटलिफ्टिंग: लवप्रीत पहिल्या प्रयत्नात यशस्वी

    पुरुषांच्या 109 किलो वजनी गटातील फायनल मध्ये भारताच्या लवप्रीतने स्नॅच मध्ये पहिल्या प्रयत्ना 157 किलो वजन उचललं.

  • 03 Aug 2022 02:57 PM (IST)

    Judo:दीपक देशवाल क्वार्टर फायनलमध्ये

    दीपक देशवाल पुरुष -100k किग्रा इवेंटच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

  • 03 Aug 2022 02:56 PM (IST)

    Weightlifting: पुरुषांच्या 109 किलो वजनी गटातील सामने सुरु

    पुरुषांच्या 109 किलो वजनी गटातील सामने सुरु झाले आहेत. पाकिस्तानच्या हनजाला बट्टने स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात 135 किलो वजन उचललं.

  • 03 Aug 2022 02:55 PM (IST)

    स्क्वॉश: कुरुविलाचा एकतर्फी विजय

    सारा कुरुविलाने गयानाच्या मॅरी विरुद्ध 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला.

  • 03 Aug 2022 02:54 PM (IST)

    लॉन बॉल: मृदुल बोरेगोहनने सामना जिंकला

    लॉन बॉल मध्ये पुरुषांच्या सिंगल्स राऊंडच्या दुसऱ्या सामन्यात मृदुलने क्रिसवर 21-5 असा दणदणीत विजय मिळवला.

  • 03 Aug 2022 02:18 PM (IST)

    CWG 2022 Live: महिला पेयर्स मध्ये भारत आघाडीवर

    Lawn Bowls मध्ये भारताच्या वुमेन्स फोरने गोल्ड जिंकून इतिहास रचला आहे. आता सिंगल्स आणि पेयर्स मध्ये भारताची पदकावर नजर आहे. महिला पेयर्स मध्ये भारतीय टीमने 7-4 अशी आघाडी घेतली आहे.

  • 03 Aug 2022 02:16 PM (IST)

    Lawn Bowls: मृदुलने पुरुष एकेरीत आघाडी घेतली

    पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या मृदुलने क्रिस लॉक विरुद्ध 2 थ्रो संपल्यानंतर 4-0 अशी आघाडी घेतली आहे.

  • 03 Aug 2022 02:08 PM (IST)

    आमचा न्यायालयावर विश्वास; कोर्ट योग्य निर्णय देईल - उदय सामंत

    सध्या प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे त्यावर अधिक बोलणं योग्य ठरणार नाही. कोर्ट योग्य निर्णय देईल आमचा न्यायालयावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

  • 03 Aug 2022 01:08 PM (IST)

    भारत पदकतालिकेत कितव्या स्थानावर?

  • 03 Aug 2022 01:06 PM (IST)

    भारताचा बारबाडोस विरुद्ध सामना

    भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज बारबाडोस विरुद्ध सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास सेमीफायनलच तिकिट पक्क होईल. भारताने याआधीच्या लढतीत पाकिस्तानचा पराभव केला. यंदा कॉमनवेल्थ मध्ये टी 20 महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

  • 03 Aug 2022 01:06 PM (IST)

    CWG 2022 मध्ये आज 3 गोल्ड मेडल मिळू शकतात

    कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये आज भारताचे काही खेळाडू मैदानात दिसतील. भारताचे तीन वेटलिफ्ट यात पुरुषांच्या 109 किलो वजनी गटात लवप्रीत सिंह, महिलांच्या 87 किलो वजनी गटात पूर्णिमा पांडे आणि पुरुष गटात गुरदीप सिंहवर नजर असेल.

  • 03 Aug 2022 01:05 PM (IST)

    पदक तालिकेत भारत कुठल्या स्थानी

    बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये एका टप्पा पूर्ण झाला आहे. राष्ट्रकुलचे पाच दिवस पूर्ण झाले आहेत. मेडल्ससाठीची स्पर्धा वेग पकडतेय. पदकतालिकेत तिसऱ्या स्थानापासून ही शर्यत सुरु होतेय. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाकडे विशाल आघाडी असून त्यांचा दबदबा कायम आहे.

Published On - Aug 03,2022 1:04 PM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.