AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : पराभवानंतर Harmanpreet Kaur ‘या’ दिग्गजाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली

INDW vs AUSW T20 WC Semifinal : सेमीफायनलमध्ये टीम इंडिया जिंकणारी मॅच हरली. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया एकवेळ विजयी मार्गावर होती. पण जेमिमा आणि हरमनप्रीतचा विकेट गेल्यानंतर सामना हातातून निसटला.

VIDEO : पराभवानंतर Harmanpreet Kaur 'या' दिग्गजाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली
harmanpreet kaur emotional
| Edited By: | Updated on: Feb 25, 2023 | 9:31 AM
Share

INDW vs AUSW T20 WC Semifinal : महिला T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 5 धावांनी निसटता पराभव केला. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांच मन मोडलं. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया जिंकणारी मॅच हरली. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया एकवेळ विजयी मार्गावर होती. पण जेमिमा आणि हरमनप्रीतचा विकेट गेल्यानंतर सामना हातातून निसटला. टीम इंडियाच पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच स्वप्न अपूर्ण राहिलं. टीम इंडियाच्या पराभवानंतर जे दृश्य जगाने पाहिलं, त्यामुळे खरोखरच भारतीय चाहत्यांच मन मोडलं. पराभवानंतर हरमनप्रीत खूपच इमोशनल झाली होती.

काही क्षणांसाठी चश्मा काढला, त्यावेळी….

हरमनप्रीत कौर मॅच संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जात होती. त्यावेळी मैदानातच माजी कॅप्टन अंजुम चोपडा तिला भेटली. अंजुम चोपडाने हरमनप्रीत कौरला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हरमनप्रीतला स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. तिचा अश्रुंचा बांध फुटला. हरमनप्रीतने डोळ्यांवर काळा चश्मा लावला होता. त्यामुळे तिचे अश्रू कोणाला दिसत नव्हते. काही क्षणांसाठी तिने चश्मा काढला त्यावेळी हरमनप्रीतच्या डोळ्यात पाणी होतं.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

ती पाय मागे घेणाऱ्यांपैकी नाही

अंजुम चोपडा यांनी हरमनप्रीत बरोबर झालेल्या भेटीबद्दल बोलताना सांगितलं की, “कदाचित हरमनप्रीत खेळली नसती. पण वर्ल्ड कपची सेमीफायनल मॅच असल्याने ती खेळली. हरमनप्रीत पाय मागे घेणाऱ्यांपैकी नाही, हे मला ठाऊक आहे” “ती नेहमी पुढे पाऊल टाकते, जसं तिने या मॅचसाठी स्वत:ला तयार केलं. तिने पूर्ण क्षमतेचे फिल्डिंग केली. बॅटिंगमध्येही तिने योगदान दिलं. मला फक्त तिचं दु:ख कमी करायचं होतं” असं अंजुम चोपडा म्हणाल्या. तोच मॅचच टर्निंग पॉइंट

हरमनप्रीत कौर वर्ल्ड कपच्या सेमीफायन मॅचमध्ये दुर्देवीरित्या रनआऊट झाली. तिने 34 चेंडूत 52 धावा फटकावल्या. दुसरी धाव घेताना तिची बॅट पीचमध्ये फसली. गार्डनरच्या थ्रो वर हिलीने तिचे बेल्स उडवले. हरमनप्रीतच्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली. भारताच स्वप्न पुन्हा एकदा मोडलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.