PAK vs NZ: न्यूझीलंडचा दौरा रद्द होताच पाकिस्तान क्रिकेटला मोठा झटका, ‘हे’ देशही दौरा रद्द करण्याच्या मार्गावर

पाकिस्तानच्या भूमीत तब्बल 18 वर्षानंतर न्यूझीलंडचा संघ क्रिकेट मालिका खेळण्यासाठी आला होता. पण पहिलाच एकदिवसीय सामना सुरु होण्यापूर्वीच संपूर्ण मालिका रद्द करण्यात आली आहे.

PAK vs NZ: न्यूझीलंडचा दौरा रद्द होताच पाकिस्तान क्रिकेटला मोठा झटका, 'हे' देशही दौरा रद्द करण्याच्या मार्गावर
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड

कराची : न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तानात असून त्याठिकाणी क्रिकेट सामन्यांच्या दौऱ्यासाठी गेला होता. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी सामने खेळवण्यात येणार होते. वनडे सीरिजने या दौऱ्याला सुरुवात होणार होती. त्यातील पहिला वनडे सामना आज (17 सप्टेंबर) खेळवण्यात येणार होता. मात्र, पहिल्याच सामन्याच्या टॉस होण्याच्या 20 मिनिटांआधीच हा सामना रद्द करण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुन्हा एक मोठा झटका बसला.

2009 साली लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय संघानी पाकिस्तानचा दौरा करणं सोडून दिलं. पण मागील काही वर्षांमध्ये यात बदल होत असून काही संघ पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर जात आहेत. नुकतेच दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघानी पाकिस्तानचा दौरा केला. त्यानंतर आता न्यूझीलंडचा संघही पाकिस्तान दौऱ्यावर आला असून आजपासून सामन्यांना सुरुवात होणार होती. पण तितक्यात न्यूझीलंडमधील सुरक्षा यंत्रणांनी संघाला सामना खेळण्यासाठी न जाण्याच्या सूचना देत सतर्क केले. ज्यानंतर संपूर्ण दौरा रद्द करण्यात आला. दरम्यान यामुळे पाकिस्तान क्रिकेटला मोठं नुकसान होणार आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यावरही टांगती तलवार

कीवी संघाने शेवटच्या मिनिटात सामना रद्द केल्याने  इतर मालिकांवरही याचा परिणाम होऊ शकतो. न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर पाकिस्तानात इंग्लंडच्या महिला आणि पुरुष संघ दौऱ्यासाठी येणार होते. तब्बल 16 वर्षानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानात दौऱ्यासाठी तयार झाला होता.  टी20 विश्वचषकाआधी हा दौरा ठेवण्यात आला होता. पण आता या घटनेनंतर या दौऱ्यावरही रद्द होण्याची टांगती तलवार लटकत आहे. पुरुष आणि महिला संघ 2-2 टी-20 सामने खेळणार असून महिला 3 वनडे सामनेही खेळणार होते.

ऑस्ट्रेलियाचा दौराही धोक्यात

न्यूझीलंड दौरा रद्द झाल्याने इंग्लंडच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मागील बराच काळापासून आशा असणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं भविष्यही धोक्यात आलं आहे.  या दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी20 अशा सर्व प्रकारचे सामने खेळवण्यात येणार होते. ही मालिका फेब्रुवारी, मार्च 2022 दरम्यान खेळवली जाणार होती. ऑस्ट्रेलिया संघ जवळपास  24 वर्षांपासून पाकिस्तान दौऱ्यावर गेलेली नाही.

हे ही वाचा

पाकिस्तानची नाचक्की! टॉसच्या अर्धा तास आधी न्यूझीलंडकडून सा्मना रद्द, पाकिस्तानविरोधात न खेळातच तातडीनं मायदेशी परतणार, नेमकं कारण काय?

रवी शास्त्रीनंतर येणाऱ्या प्रशिक्षकासाठी ‘हे’ असेल मोठं काम, कर्णधार बदलल्यानंतर प्रशिक्षकाचं काम वाढणार

(After New Zealand cricket team abandon pakistan tour now england and australian team may also cancel there tours)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI