AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2021 : ‘आकाश चोप्राची काळी जीभ’, आऊट होण्याची भविष्यवाणी आणि दुसऱ्या बॉलला विराट कोहली तंबूत!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची मॅच हारल्यानंतर नेटकरी भारतीय संघाला ट्रोल करतच आहेत पण त्याचबरोबर आकाश चोप्रादेखील ट्रोल करत आहेत. आपण पाहूयात नेमकं काय कारण आहे....? (Akash Chopra trolled on Social Media After Virat Kohli Wicket India vs New Zealand Wtc Final 2021)

WTC Final 2021 : 'आकाश चोप्राची काळी जीभ', आऊट होण्याची भविष्यवाणी आणि दुसऱ्या बॉलला विराट कोहली तंबूत!
आकाश चोप्रा आणि विराट कोहली
| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 9:52 AM
Share

मुंबई : आकाश चोप्रा (Akash Chopra)… भारतीय क्रिकेट समालोचकांमधलं आघाडीचं नाव… जो की भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर देखील राहिलेला आहे. आकाश चोप्राने अत्यंत कमी काळात आपल्या कॉमेंट्रीने जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयावर राज्य केलंय. मैदानात आक्रमक फटके मारणारे खेळाडू आणि आकाश चोप्राची जादूई कॉमेंट्री असं जर मिश्रण असेल तर मॅच पाहण्याची मजा काही वेगळीच असते… पण कधी कधी आपल्या कॉमेन्ट्रीमुळे आकाश चोप्राला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची मॅच हारल्यानंतर नेटकरी भारतीय संघाला ट्रोल करतच आहेत पण त्याचबरोबर आकाश चोप्रादेखील ट्रोल करत आहेत. आपण पाहूयात नेमकं काय कारण आहे….? (Akash Chopra trolled on Social Media After Virat Kohli Wicket India vs New Zealand Wtc Final 2021)

आकाश चोप्राने आऊट होण्याची भविष्यवाणी वर्तवली आणि…

ऐतिहासिक साऊथहॅम्प्टन कसोटीत न्यूझीलंड संघाने भारताचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव केलाय. सगळ्यांच आघाड्यांवर न्यूझीलंडची टीम भारतापेक्षा वरचढ ठरली. पावसाने गोंधळ घालूनही अगदी तीन ते सव्वा तीन दिवसांत किवी संघाने भारतावर अगदी सहज विजय मिळवला. पहिल्या डावांत दोन्ही संघ तसे तुलनेने एकाच स्थितीत होते. दुसरा डाव क्रुशियल होता. मात्र पहिल्या दोन विकेट्स लवकर गेल्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मैदानात उतरावं लागलं.  विराट बॅटिंग करत असताना आकाश चोप्रा कॉमेन्ट्री करत होता. याचवेळी आकाश चोप्राने भारतीय बॅट्समनची आऊट होण्याची भविष्यवाणी वर्तवली आणि त्याच्या पुढच्याच बॉलला कर्णधार विराट कोहलीला तंबूत जावं लागलं.

नेमकं काय घडलं….?

भारतीय संघाचे सलामीवीर शुबमन गिल आणि रोहित शर्मा लवकरच तंबूत परतले होते. मैदानावर विराट आणि पुजाराची जोडी होती. दोघेही संथ खेळत होते. दोघांवर भारताच्या मोठ्या आशा होत्या. तेवढ्यात टीव्ही कॅमेराने अजिंक्य रहाणेचा चेहरा दाखवला. लागलीच आकाश चोप्राने कॉमेन्ट्री करताना “अजिंक्य रहाणे पुढचा बॅट्समन आहे. परंतु आता जर कुणी (विराट/पुजारा) आऊट झालं तर रिषभ पंतही बॅटिंगसाठी येऊ शकतो”, असं म्हणत भारतीय बॅट्समनच्या विकेट्सची भविष्यवाणी केली.

आणि आश्चर्य म्हणजे आकाश चोप्राच्या भविष्यवाणीनंतर दुसऱ्या बॉलला विराट कोहलीची विकेट गेली. काईल जॅमिसनच्या बॉलवर विकेट कीपर बीजे बॅटलिंगकडे सोपा झेल देऊन तो बाद झाला. काईलने मॅचमध्ये दुसऱ्यांदा कोहलीला आऊट केलं.

सोशल मीडियावर ट्रोल

कोहली आऊट होताच आकाश चोप्रा सोशल मीडियावर ट्रोल झाला. आकाश चोप्राची काळी जीभ आहे, त्याने भविष्यवाणी करताच, कोहली आऊट झाला, असं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं. असे अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यामधून आकाश चोप्रा ट्रोल झाला.

(Akash Chopra trolled on Social Media After Virat Kohli Wicket India vs New Zealand Wtc Final 2021)

हे ही वाचा :

WTC Final 2021 : रिषभ पंत आणि पुजाराच्या एक चुकीने होत्याचं नव्हतं झालं, चॅम्पियनशीपची गदा हातातून गेली!

WTC Final 2021 : म्हणून अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला, विराटने सांगितली 2 कारणं!

WTC Final 2021 : न्यूझीलंडचा जिगरबाज खेळाडू, कारकीर्दीतील शेवटची कसोटी, बोट तुटलं तरीही खेळतच राहिला…!

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.