AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2021 : रिषभ पंत आणि पुजाराच्या एक चुकीने होत्याचं नव्हतं झालं, चॅम्पियनशीपची गदा हातातून गेली!

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पुजारा आणि पंत या दोघा खेळाडूंनी एक मोठी चूक केली ज्या चुकीची किंमत भारताने मोजली आहे. ( India vs New Zealand WTC Final 2021)

WTC Final 2021 : रिषभ पंत आणि पुजाराच्या एक चुकीने होत्याचं नव्हतं झालं, चॅम्पियनशीपची गदा हातातून गेली!
रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jun 24, 2021 | 9:07 AM
Share

मुंबई : रिषभ पंत (Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)… भारतीय संघाचे दोन खंदे शिलेदार…. संघ अडचणीत असताना या दोन खेळाडूंची बॅट नेहमी बोलते किंबहुना सामन्याचा निकाल बदलवण्याची ताकद या दोन खेळाडूंमध्ये आहे. परंतु आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) या दोघाही खेळाडूंनी एक मोठी चूक केली ज्या चुकीची किंमत भारताने मोजली आहे. भारताच्या हातून 144 वर्षांच्या गौरवशाली इतिहासातील पहिल्यांदा मिळू शकणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची गदा निसटली आहे. जर पंत आणि पुजाराने जबाबदारीने ही चूक टाळली असती, तर सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असता आणि करोडो भारतवासियांनी देशभरात दिवाळी साजरी केली असती. पण आता हे केवळ स्वप्नच राहिलं आहे… किवी संघाने भारताचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना जिंकण्याची अद्वितीय कामगिरी केली आहे.  (Rishabh Pant irresponsible Shot Cheteshwar pujara Dropped Ross taylor Catch India vs New Zealand WTC Final 2021)

रिषभ पंतचा बेजबाबदार फटका….

दुसऱ्या डावांत भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना रिषभ पंत बेजबाबदार फटका खेळून तंबूत परतला. तत्पूर्वी त्याने संघासाठी 41 रन्स केले होते. परंतु त्याने आणखी 10 ते 15 ओव्हर्स पीचवर पाय रोवायला हवे होते, भलेही त्याच्या बॅटमधून कमी धावा आल्या असत्या, पण रिषभने बेजबाबदार फटका मारुन आऊट व्हायला नको होतं, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होत आहे.

रिषभ पंत जर पीचवर असता तर मॅचचा निकाल काही वेगळाच लागला असता. गाबाच्या पिचवर त्याने जी कमाल करुन दाखवली होती, तशाच खेळीची भारतीय क्रिकेट रसिकांना आशा होती. परंतु रिषभने पुढचा मागचा कशाचाही विचार न करता हवेत बॉल खेळला आणि हेन्री निकोलसने त्याचा अप्रतिम कॅच पकडून रिषभच्या खेळीची सांगता केली आणि भारताच्या स्वप्नांना लगाम घातला.

पुजाराने कॅच नव्हे मॅच सोडली…

भारत दुसऱ्या डावात केवळ 170 धावांवर ऑल आऊट झाला. न्यूझीलंडला जिंकण्यासाठी भारताने 139 धावांचे छोटेखानी लक्ष ठेवलं. मग अशा वेळी भारताने क्षेत्ररक्षणात कमाल दाखवायला हवी होती. परंतु भारताच्या चेतेश्वर पुजाराने अगदी निर्णाक क्षणी संघाचा किवी धडाकेबाज बॅट्समन रॉस टेलरचा कॅच सोडला. भारताने मॅच गमावण्यात या मॅचचा मोठा वाटा राहिला.

31 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने रॉस टेलरला एक अप्रतिम बॉल टाकला. रॉसच्या बॅटची कड लागून बॉल पूजाराच्या हातात गेला. पण पुजाराच्या हातून बॉल सटकला आणि टेलर आउट होता होता वाचला. त्यावेळी 84 धावांवर दोन गडी बाद असा न्यूझीलंडचा स्कोअर होता. जर त्यावेळी टेलरचा कॅच पुजाराने पकडला असता तर न्यूझीलंडचा संघ दडपणात आला असता आणि मॅचचा निकाल काही वेगळाही लागू शकला असता, अशी समाज माध्यमांवर चर्चा आहे.

(Rishabh Pant irresponsible Shot Cheteshwar pujara Dropped Ross taylor Catch India vs New Zealand WTC Final 2021)

हे ही वाचा :

WTC Final 2021 : म्हणून अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला, विराटने सांगितली 2 कारणं!

WTC Final 2021 : न्यूझीलंडचा जिगरबाज खेळाडू, कारकीर्दीतील शेवटची कसोटी, बोट तुटलं तरीही खेळतच राहिला…!

WTC Final 2021 : ‘चॅम्पियन’ न्यूझीलंड मालामाल, भारताचाही खिसा गरम, पाहा कुणाला किती बक्षिसाची रक्कम मिळाली…

विराट कोहलीला न्यूझीलंडने नाही हरवलं तर संघातीलच एका खेळाडूने धोका दिला, विराटसह करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

Follow Us
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी