…म्हणून सर्वांना मिळायची पार्टी! अर्जुन तेंडुलकरचं एक गुपित यशस्वी जयस्वालने केलं उघड
अर्जुन तेंडुलकर आणि यशस्वी जयस्वाल यांनी एकत्रित मुंबईसाठी खेळताना बऱ्याच गोष्टी एकत्र केल्या आहेत. दोघेही मुंबईच्या अंडर 19 संघात खेळले आहेत. मात्र आता दोघंही देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या संघाकडून खेळत आहेत. असं असताना यशस्वी जयस्वालने अर्जुन तेंडुलकरचं एक गुपित उघड केलं आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने घरातूनच क्रिकेटचे धडे गिरवले. त्यानंतर अंडर 19 संघात मुंबईत आपलं नशिब आजमावलं. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळत आहे. अर्जुन तेंडुलकरची माहिती त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून घेत असतात. पण त्याच्यासोबत वेळ घालवलेल्या खेळाडूने त्याचं एक गुपित उघड केलं आहे. अर्जुन तेंडुलकरने मुंबईकडून खेळताना त्याने सध्या भारतीय संघात खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केला आहे. यात एक नाव आहे यशस्वी जयस्वालचं… एका कार्यक्रमात यशस्वी जयस्वालला कधी अर्जुन तेंडुलकरसोबत ड्रेसिंग रूम शेअर केला आहे का? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने एक झटक्यात ‘हो’ असं उत्तर दिलं. यशस्वी जयस्वालने खुलासा केला की त्याने मुंबईच्या अंडर 19 संघासाठी अर्जुन तेंडुलकरसोबत ड्रेसिंग रूम शेअर केला आहे. इतकंच काय तर यशस्वी अर्जुनसोबत ड्रेसिंग रूमध्ये घालवलेल्या क्षणांचा उलगडा केला. यशस्वीला अर्जुनच्या स्वभाव आणि आवडीबाबत विचारलं गेलं. त्याबाबतही त्याने दिलखुलास उत्तर दिलं.
यशस्वी जयस्वालने अर्जुनच्या स्वभावाबाबत सांगितलं की, अर्जुनचं ड्रेसिंग रूमधील वागणूक चांगली होती यात काही दुमत नाही. तो सर्वांसोबत मिळून मिसळून राहायचा. त्यांची राहण्याची पद्धत काही वेगळी होती. पण आम्ही सर्व त्याच्यासोबत आनंद साजरा करायचो. यशस्वी जयस्वालने पुढे त्याच्या आवडीबाबत खुलासा करत सांगितलं की, अर्जुनला चांगलं मांस खाण्याची आवड होती. जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये असायचो तेव्हा तो सर्वांसाठी मांस ऑर्डर करायचा. आम्ही सर्व जण एकत्र खायचो आणि मजा करायचो.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्जुन तेंडुलकर आता गोवा संघाकडून खेळत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत चांगली कामगिरी करत आहे. तर यशस्वी जयस्वाल दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर मुंबईकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. आता मुंबईकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळणार आहे. दरम्यान, यशस्वी जयस्वाल हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. तर अर्जुन तेंडुलकरला ट्रेड विंडोच्या माध्यमातून लखनौ सुपर जायंट्सने मुंबईकडून आपल्या संघात घेतलं आहे. अर्जुन तेंडुलकर लवकरच लग्नबंधनातही अडकणार आहे. त्याचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे.
