हा ऑपरेशन सिंदूरचा बदला असेल…, अरुण जेटली स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी
Arun Jaitley Stadium Threat India Pak Situation : भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. जाणून घ्या.

भारतीय सैन्य दलाकडून गेल्या 2 दिवसांपासून ‘ऑपरशेन सिंदूर’द्वारे पाकिस्तावर प्रतिहल्ला करण्यात येत आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक करत पहलगाम दहशतादी हल्ल्याचा बदला घेतला. त्यामुळे जळफळाट झालेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व मनसुबे उधळवून लावले आहेत. भारताला कोणत्याही बाजूने उत्तर देता येत नसल्याने पाकिस्तान तोंडघशी पडली आहे. मात्र त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नाव घेत नाही. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान क्रिकेट स्टेडियम उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम बॉम्बने उडवण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी इमेलद्वारे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ही कारवाई ऑपेरशने सिंदूरचा बदला असेल, असंही या इमेलमध्ये म्हटलं आहे. हा मेल निनावी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी असंच पाकिस्तामधून गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडण्याची धमकी देण्यात आली होती.
डीडीसीए अर्थात दिल्ली आणि डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनला शुक्रवारी 9 मे रोजी निनावी मेल करण्यात आला. या मेलमध्ये अरुण जेटली स्टेडियममध्ये उडवण्याची धमकी देण्यात आली. अरुण जेटली स्टेडियम दिल्ली कॅपिट्ल्सचा होम ग्राउंड आहे. या स्टेडियममध्ये 11 मे रोजी आयपीएलच्या 18 व्या मोसमातील दिल्ली विरुद्ध पंजाब हा सामना खेळवण्यात येणार होता. मात्र 2 देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव उर्वरित आयपीएल 2025 स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
“आम्हाला आज सकाळ निनावी धमकीचा मेल मिळाला. हा मेल आम्ही दिल्ली पोलिसांना माहितीसाठी पाठवा. पोलिसांनी तात्काळ स्टेडिमची पाहणी केली”, असं डीडीसीएच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.
अरुण जेटली स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी
The Arun Jaitley Stadium received a bomb threat via email on Friday morning, and a police complaint has been registered, a top DDCA official told IANS. “There will be a bomb blast in your stadium. We have a committed Pakistan sleeper cell active in India. The blast will be our… pic.twitter.com/vkOgUEY5DT
— IANS (@ians_india) May 9, 2025
मेलमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख
भारतात पाकिस्तान समर्थित स्लीपर सेल असल्याचा दावा या मेलमध्ये करण्यात आला आहे. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे काही वेळ चिंतेचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर तातडीने पाहणी केली. तसेच स्टेडियमच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे.
