T20 World Cup 2021 : निवृत्तीआधी असगर अफगाणचा मोठा कारनामा, T20I मध्ये धोनीसह 3 दिग्गजांना पछाडलं

अफगाणिस्तानचा पहिला स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार असगर अफगान (Asghar Afgan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अंतिम सामन्या वेळी मैदानातच त्याला अश्रू अनावर झाले.

T20 World Cup 2021 : निवृत्तीआधी असगर अफगाणचा मोठा कारनामा, T20I मध्ये धोनीसह 3 दिग्गजांना पछाडलं
Asghar Afghan - MS Dhoni
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 8:30 PM

मुंबई : T20 विश्वचषक 2021 मध्ये अफगाणिस्तानची उत्कृष्ट कामगिरी नामिबियाविरुद्धच्या सामन्यातही कायम राहिली. त्यांनी नामिबियाविरोधात मोठा विजय मिळवला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांमधला हा त्यांचा दुसरा विजय आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एका पराभवानंतर त्यांनी चांगलं पुनरागमन केलं आहे. अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात स्कॉटलंडवर 130 धावांनी मोठा विजय मिळवला होता. नामिबियावरील विजयानंतर अफगाणिस्तानचा संघ त्यांच्या गटात 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या विजयासह त्यांनी आपला सहकारी खेळाडू आणि माजी कर्णधार असगर अफगाणलाही शानदार निरोप दिला आहे. असगर अफगाणचा हा शेवटचा सामना होता. (Asghar Afghan Breaks MS Dhoni Record to win most T20I matches as a Captain As Afghanistan beat Namibia)

अफगाणिस्तानचा पहिला स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार असगर अफगान (Asghar Afgan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अंतिम सामन्या वेळी मैदानातच त्याला अश्रू अनावर झाले. कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात तो निवेदकाशी बोलताना तसेच तंबूत गेल्यावरही रडत असल्याचं पाहायला मिळालं. असगरने त्याच्या अखेरच्या सामन्यात 23 चेंडूत 31 धावांची खेळी केली. दरम्यान, निवृत्तीपूर्वी असगर अफगाणने मोठा कारनामा केला आहे.

असगर अफगाणची विक्रमी कामगिरी

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत असगरने धोनीला मागे टाकले आहे. धोनीने कर्णधार म्हणून भारतासाठी 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 41 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, असगर अफगाणने 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. म्हणजेच, सर्वाधिक विजय नोंदवणाऱ्या T20I कर्णधारांमध्ये असगर अफगाणचे स्थान पहिले आणि एमएस धोनी दुसऱ्या स्थानी आहे.

मॉर्गन तिसऱ्या क्रमांकावर

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांमध्ये इंग्लंडचा ऑईन मॉर्गन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने इंग्लंडसाठी 40 टी-20 सामने जिंकले आहेत. तो सध्या ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे, त्यावरून तो आगामी काळात धोनी आणि असगर अफगाण या दोघांनाही मागे टाकेल असे दिसते. बाबर आझम कर्णधार म्हणून सध्या पाकिस्तानसाठी आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. पण, सरफराज अहमद सध्या त्यांच्यासाठी सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा कर्णधार आहे. सरफराजने त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानसाठी 29 सामने जिंकले आहेत.

असगरची कारकिर्द

असगरने 2009 साली स्कॉटलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय डेब्यू केला. त्याने अफगानिस्तानकडून 6 टेस्ट सामने, 115 वनडे आणि 75 टी-20 सामने खेळले. टेस्टमध्ये 44.00 च्या ,सरासरीने 440 रन आणि वनडेमध्ये 24.73 च्या सरासरीने 2 हजार 467 रन केले आहेत. भी बनाए हैं. त्याने दोन्ही प्रकारात एक-एक शतकही लगावलं आहे. तर टी20 फॉर्मेटमध्ये 1 हजार 358 धावा त्याने केल्या आहेत. असगरने 59 वनडे आणि 52 टी-20 सामन्यात कर्णधार म्हणून काम पाहिलं. यात 52 पैकी 42 टी20 सामन्यात अफगाणिस्तानचा संघ विजयी झाला.

अफगाणिस्तानचा नामिबियावर 62 धावांनी मोठा विजय

दरम्यान, आजच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकात 5 गडी गमावून 160 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी सलामीवीर मोहम्मद शहजादने 33 चेंडूत 45 धावा केल्या. याशिवाय जजाईने 27 चेंडूत 33 धावा केल्या. असगर अफगाणने 23 चेंडूत 31 तर कर्णधार मोहम्मद नबीने 17 चेंडूत 32 धावा केल्या. नामिबियासाठी ट्रम्पमन पुन्हा एकदा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 2 बळी घेतले.

अफगाणिस्तानने दिलेल्या 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात नामिबियाचा संघ अपयशी ठरला. या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचे फलंदाज एकही भागीदारी रचू शकले नाहीत. जे त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. नामिबियासाठी डेव्हिड व्हिसाने सर्वाधिक 26 धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाने 20 धावांचा आकडा गाठला नाही. संपूर्ण संघ 20 षटकांत 9 विकेट गमावून केवळ 98 धावा करू शकला आणि हा सामना 62 धावांच्या मोठ्या फरकाने गमावला. अफगाणिस्तानकडून हमीद हसन आणि नवीन-उल-हक हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले, या दोघांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले.

इतर बातम्या

T20 World Cup : हार्दिक पंड्याला आणखी एक संधी, NZ विरुद्धच्या सामन्यात जुन्या Playing XI सह टीम इंडिया मैदानात उतरणार?

T20 World Cup मध्ये 6 चेंडूत 4 षटकार ठोकून सामना जिंकणाऱ्या खेळाडूचा ट्विटरवर सवाल, ‘अजून काही आदेश?’

T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खान चमकला, मलिंगाला टाकलं मागे

(Asghar Afghan Breaks MS Dhoni Record to win most T20I matches as a Captain As Afghanistan beat Namibia)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.