Aus vs Ind 4th test | नटराजनचं कसोटी पदार्पण, अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

Aus vs Ind 4th test | नटराजनचं कसोटी पदार्पण, अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
यॉर्कर किंग थंगारासू नटराजन

टी नटराजन आणि वॉशिग्ंटन सुंदरने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलं आहे.

sanjay patil

|

Jan 15, 2021 | 10:52 AM

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ब्रिस्बेन येथे चौथा कसोटी (Aus vs Ind 4th test) सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातून थंगारासू नटराजनने ( T Natrajan Test Debut) कसोटी पदार्पण केलं आहे. नटराजन टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा 300 वा खेळाडू ठरला आहे. नटराजनने यासह ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. (aus vs ind 4 test t natarajan becomes first Indian who make International debut all three formats the australia tour)

नटराजनचं कसोटी पदार्पण

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतग्रस्त आहे. तो अजून या दुखापतीतून सावरला नाही. त्यामुळे बुमराहच्या जागी नटराजनला पदार्पणाची संधी मिळाली आहे. नटराजन एकाच दौऱ्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे. आयसीसीने स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

नटराजनचं ऑस्ट्रेलियाविरोधात तिन्ही प्रकारात पदार्पण

नटराजनने याआधी ऑस्ट्रेलियाविरोधात या दौऱ्यातच एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत पदार्पण केलं होतं. इतर खेळाडू दुखापतग्रस्त झाले. ही दुखापत नटराजनच्या पथ्यावर पडली. त्यामुळे नटराजनला एकदिवसीय आणि टी 20 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. नटराजनने एकदिवसीय आणि टी 20 मध्ये आपली चुणूक दाखवली. त्यामुळे या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीतही नटराजनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

वॉश्गिंटन सुंदरचेही पदार्पण

नटराजनसोबत वॉशिंग्टन सुंदरनेही (Washington sunder) कसोटी पदार्पण केलं आहे. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे अश्विनच्या जागी ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला पदार्पणाची संधी मिळाली आहे. सुंदर टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा 301 वा खेळाडू ठरला आहे. अश्विनने सुंदरला टेस्ट कॅप देऊन अभिनंदन केलं.

वॉशिंग्टन सुंदरचे पदार्पण

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 4th Test, 1st Day Live : अर्धशतक पूर्ण होताच लाबूशेनचा आक्रमक पवित्रा, ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 150 धावा

(aus vs ind 4 test t natarajan becomes first Indian who make International debut all three formats the australia tour)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें