AUS vs IND 1st T20i : मानुका ओव्हलमध्ये पावसाचा विजय, भारत-ऑस्ट्रेलिया पहिला सामना रद्द
India vs Australia 1st T20i Match Result : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिला सामना हा पावसाने जिंकला आहे. या सामन्यात पाऊस विघ्न घालणार असल्याचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा अखेर पावसामुळे रद्द करावा लागला आहे. उभयसंघातील पहिला सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला होता. पावसाने काही षटकांनंतर एन्ट्री घेतल्याने सामना 18 ओव्हरचा करण्यात आला. त्यानंतर खेळाला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पावसाने दुसऱ्यांदा एन्ट्री घेतली. त्यामुळे पुन्हा खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची खेळाला पुन्हा केव्हा सुरुवात होते? याची प्रतिक्षा होती. मात्र बराच वेळ वाया गेल्यानंतर सामना रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली.
सामन्यात नक्की काय झालं?
भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी टॉस झाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. पहिल्या डावात 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. पावसामुळे जवळपास 40 मिनिटांपेक्षा अधिक वेळ वाया गेला. त्यानंतर दुपारी 3 वाजता खेळाला (18 ओव्हर) पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर 28 बॉलनंतर पावसाने कमबॅक केलं. भारताने 9.4 ओव्हरमध्ये 97 धावा केल्या होत्या. तेव्हा पावासाची सुरुवात झाली. पावसामुळे पहिला डाव संपवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाला डीएलएसनुसार 5 ओव्हरमध्ये 71 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. मात्र पावसाच्या विघ्नामुळे खेळ झाला नाही. त्यामुळे सामना रद्द करावा लागला.
टीम इंडियाची बॅटिंग
भारतीय फलंदाजांनी फलंदाजीच्या संधीचा पूर्णपणे फायदा घेत मनसोक्त फटकेबाजी केली. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामी जोडीने 35 धावांची भागीदारी केली. भारताने अभिषेक शर्मा याच्या रुपात पहिली आणि एकमेव विकेट गमावली. अभिषेकने 14 बॉलमध्ये 4 फोरसह 19 रन्स केल्या.नॅथन एलिसने अभिषेकला आऊट केलं.
त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल या जोडीने जोरदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. मात्र पावसाने या दोघांच्या फटकेबाजीला ब्रेक लावला. पावसामुळे 9.4 ओव्हरमध्ये खेळ थांबवावा लागला. तोवर शुबमन-सूर्या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 35 बॉलमध्ये नॉट आऊट 62 रन्सची पार्टनरशीप केली. शुबमनने 20 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 4 फोरसह 37 रन्स केल्या. तर सूर्याने 24 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 39 धावांची खेळी केली.
पहिला सामना पावसाने जिंकला
The first #AUSvIND T20I has been abandoned due to rain. 🌧️
Scorecard ▶️ https://t.co/VE4FvHBCbW#TeamIndia pic.twitter.com/biJYDFe9Ah
— BCCI (@BCCI) October 29, 2025
दुसरा सामना केव्हा?
दरम्यान उभयसंघातील दुसरा सामना हा शुक्रवारी 31 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे.
